करिअरनामा ऑनलाईन । बरेच विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर (Career at NASA) अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतात. अनेकांना अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे असते. परंतु, अभियांत्रिकी क्षेत्रातही अनेक शाखा आहेत, या शाखांपैकी बहुतांश मुले संगणक विज्ञान (Computer Science) निवडतात. काही सिव्हिल घेतात, तर काही मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलकडे जातात. पण तुम्हाला माहित आहे का, अभियांत्रिकीमध्येच एक शाखा आहे, ती म्हणजे वैमानिक अभियांत्रिकीची. या शाखेत प्रवेश घेतल्यास तुमचे भविष्य इतर क्षेत्रातील अभियंत्यांपेक्षा चांगले होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही अॅरोनॉटिकल इंजिनिअरचे शिक्षण घेता तेव्हा तुम्हाला नासासारखी वैज्ञानिक संस्था लगेच नोकरी देऊ शकते. आज आपण Aeronautical Engineering मधील करिअरच्या संधी विषयी संविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
काय असतं Aeronautical Engineering – (Career at NASA)
नोकरीच्या उत्तम संधी असल्या तरी हे क्षेत्र अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वात कठीण क्षेत्र मानले जाते. त्यामुळे बरेच विद्यार्थी या क्षेत्रात येण्यास घाबरतात. तुम्ही एकदा अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंग केले की तुमच्यासाठी भविष्यात अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. अॅरोनॉटिकल नॉटिकल इंजिनीअरिंगची पदवी घेत असलेले विद्यार्थी अवकाश संशोधन, संरक्षण तंत्रज्ञान आणि क्षेपणास्त्रे तसेच लष्करी विमानांची निर्मिती करण्याचे शिक्षण घेतात.
यासाठी आवश्यक पात्रता –
तुम्हाला अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंग करायचे असेल तर ते पदवी आणि पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट स्तरावर करता येते. पदवी स्तरावर वैमानिक अभियांत्रिकी अभ्यासक्रम (Career at NASA) करण्यासाठी विद्यार्थ्याने बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात किमान 50 ते 60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
दुसरीकडे जर तुम्हाला अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असेल तर तुम्हाला पदवीधर असणे आवश्यक आहे. देशातील अव्वल वैमानिक अभियांत्रिकी संस्था पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश परीक्षा घेतात आणि ती प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्हाला गुणवत्तेनुसार कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळेल.
अशा आहेत करिअरच्या संधी आणि पगार –
- अॅरोनॉटिकल इंजिनिअर्सना भारतातील आणि परदेशातील अनेक खासगी विमान कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळते.
- नॅशनल अॅरोनॉटिकल लॅबमध्ये (Career at NASA) संरक्षण मंत्रालयाच्या अनेक प्रकल्पांमध्ये, नागरी विमान वाहतूक विभागात, इस्रो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये आणि अगदी नासामध्येही उत्कृष्ट नोकऱ्या मिळतात.
- सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला नासा सारख्या (Career at NASA) संस्थेत नोकरी मिळाली तर तुमचा सुरूवातीचा वार्षिक पगार 12 ते 15 लाख रुपये असू शकतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com