Career as Train Hostess : महिलांसाठी Train Hostess म्हणून करिअरची संधी; जाणून घ्या सविस्तर…

करिअरनामा ऑनलाईन । Air Hostess हा जॉब हाय प्रोफाइल आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. (Career as Train Hostess) पण Air Hostess प्रमाणेच Train Hostess असतात हे तुम्हाला माहिती आहे का?? Air Hostess प्रमाणेच ट्रेनमध्ये प्रवाशांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी Train Hostess असतात. यामध्येही करिअरच्या अनेक संधी असतात. काही वर्षांपूर्वी रेल्वेने आपल्या प्रीमियम ट्रेनमध्ये Train Hostess ची नवीन प्रोफाइल आणली होती. पण कोरोना काळात या सेवेवर बंदी घालण्यात आली होती. चला तर मग जाणून घेऊया Train Hostess म्हणून करिअर कारण्यासाठी कशी संधी आहे….

Train Hostess आणि Air Hostess यांच्या जॉब प्रोफाइलमध्ये खूप फरक आहे. एअर होस्टेसची जॉब प्रोफाईल खूपच ग्लॅमरस मानली जाते, तर Train Hostessची नोकरी सोपी असते. दोन्हीची भरती प्रक्रिया, प्रशिक्षण आणि वेतन यामध्येही मोठा फरक आहे. ट्रेन होस्टेसशी संबंधित सर्व आवश्यक माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

हे पण वाचा -
1 of 17

अशी असते भरती प्रक्रिया – (Career as Train Hostess)

IRCTC ने वंदे भारत ट्रेन मध्ये एअर होस्टेस अकादमीद्वारे ट्रेन होस्टेसची भरती सुरू केली होती. दुसरीकडे, रेल्वे होस्टेसना खाजगी गाड्यांमध्ये आउटसोर्स केले गेले आहे. कदाचित काही काळानंतर Train Hostessच्या भरती प्रक्रियेत बदल होईल.

ट्रेन होस्टेससाठी आवश्यक पात्रता –

Train Hostess आणि Air Hostess च्या नोकरीसाठी आवश्यक पात्रता जवळजवळ समान आहे. Train Hostessसाठी 12वी पास, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि एक वर्षाचा डिप्लोमा असणे अनिवार्य करण्यात आले आहे. परदेशी प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी इंग्रजी भाषेचे आकलन आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

Air Hostess प्रमाणे Train Hostess साठी वयाचे बंधन नाही. (Career as Train Hostess) मात्र, त्यांना 6 महिन्यांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करायचा आहे. ट्रेन होस्टेसचे प्रशिक्षण अकादमीमध्येच होते. त्यांना रेल्वेसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.

किती मिळतो पगार –

Air Hostessच्या पगाराशी तुलना केली तर Train Hostess चा पगार कमी आहे. जिथे Air Hostessला सुरुवातीच्या स्तरावर 50 हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो, तर Train Hostessचा सुरवातीचा पगार सुमारे 25 हजार रुपये आहे.

तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायची इच्छा असेल (Career as Train Hostess) तर Train Hostessचा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com