Career as a Dog Trainer : ‘डॉग ट्रेनर’ म्हणून बनवलं जाऊ शकतं करिअर… जाणून घ्या एक इंजिनीअर कसा बनला डॉग ट्रेनर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आपलं करियर निवडताना (Career as a Dog Trainer) अभ्यासावर भर द्यावा? बाकी लोकं काय म्हणतायेत याकडे लक्ष द्यावं की स्वतःची आवड जोपासावी? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. आजकाल देशात करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. असंही म्हटलं जातं की आत्मविश्वासाच्या बळावर कुठल्याही क्षेत्रात करिअर घडवता येतं. आणि एखाद्या क्षेत्राबद्दल जर का आवड असेल तर येणाऱ्या अडचणी देखील आपल्याला कठीण वाटत नाहीत. अशीच आजची गोष्ट आहे एका इंजिनियरची, ज्यांनी आपल्या छंदालाच करियर बनवलं‌. तर कोण आहेत हे, काय आहे त्यांचा छंद आणि कसा होता त्यांचा प्रवास हे जाणून घ्या…

इंजिनीअर ते डॉग ट्रेनर (Dog Trainer)
श्रीकांत वाढी हे नागपूरमधील इलेक्ट्रॉनिक आणि टेली कम्युनिकेशन इंजिनियर आहेत. पेशाने इंजिनियर असलेल्या श्रीकांत यांना बालपणापासून कुत्र्यांबद्दल फारच आकर्षण होते. आज त्यांच्या या आवडीचे रूपांतर करिअरमध्ये झाले आहे. घरी एखादं कुत्र्याचं पिल्लू जरी आणलं तरी ते अगदी मनापासून त्याची काळजी घ्यायचे. मात्र जस जसं वय वाढत गेलं तसं शिक्षण पूर्ण करत त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशनमध्ये डिग्री मिळवली व ते इंजिनीअर बनले. मात्र कुत्र्यांसाठी असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपली आवड जोपासायचं ठरवलं आहे.

डॉग ट्रेनिंगचे घेतले प्रशिक्षण 
या मुक्या प्राण्याला शिकवण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा अभ्यास त्यांनी स्वतः केला आहे. सुरुवातीला इंटरनेटच्या मदतीने त्यांनी देश विदेशातील अनेक ऑनलाईन क्लासेस जॉईन करून आपले प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर भारतात होणारे अनेक सेमिनार्स देखील त्यांनी (Career as a Dog Trainer) पाहिले. ते म्हणतात की, “डॉग ट्रेनिंग ही काळाची गरज आहे व मी माझ्या शिक्षणातून या बाबतीत येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. डॉग ट्रेनर्स ना पगार देखील चांगला मिळतो, सुरुवातीला या बाबतीत एवढी जागरूकता नव्हती पण आता परिस्थिती बदलत आहे त्यामुळे इच्छुक लोकं करिअर म्हणून याचा विचार करू शकतात.

पेट ट्रेनर्सची मागणी वाढतेय (Career as a Dog Trainer)
आज-काल अनेकांच्या घरात पाळीव कुत्रा पाहायला मिळतो, पेट पेरेंटिंग (Pet Parenting) ही नवीन संकल्पना आपल्या देशात रुजू होत आहे ज्या अंतर्गत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला अशा ट्रेनर्सची गरज असते. अनेक ठिकाणी देश विदेशातील कुत्र्यांच्या जाती मोठ्या प्रमाणात लोकं पाळतात. एवढंच नाही तर लोकं आपल्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे त्या कुत्र्यांची काळजी देखील घेतात. कुत्र्यांसाठी डॉग हाऊस, डॉग फूड, डॉग क्लोथिंग यासारख्या अनेक गोष्टी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत मग अशा वेळी कुत्र्यांची आवड असल्यास डॉग ट्रेनर म्हणून देखील आपण आपले उत्तम करिअर घडवू शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com