करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही नुकतीच 12 वी परीक्षा पास केली आहे (Career After 12th) आणि तुम्ही विविध शॉर्ट टर्म कोर्सेसच्या शोधात आहात; तर मग ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. वेब डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझाइन, कंटेंट रायटिंग आणि डेटा सायन्स अशा शॉर्ट-टर्म कोर्सेसच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोर्सेस निवडून तुम्ही तुमच्या करिअरची वाट शोधू शकता. माहिती घेवूया अशा काही शॉर्ट टर्म कोर्सबद्दल जे तुम्ही 12 वी नंतर करु शकता.
1. ग्राफिक डिझायनिंग (Graphic Designing)
ज्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी आकर्षक पद्धतीने सादर करण्याची (Career After 12th) आवड आहे त्यांच्यासाठी ग्राफिक डिझाइन कोर्स योग्य पर्याय असू शकतो. या कोर्समध्ये तुम्ही डिझाइनची मूलभूत तत्त्वे, फॉन्टचा वापर (टायपोग्राफी), Adobe Photoshop आणि Illustrator सारखे सॉफ्टवेअर कसे वापरावे हे शिकू शकता.
2. कन्टेन्ट रायटिंग (Content Writing)
तुमच्याकडे उत्कृष्ट लेखन क्षमता असेल तर, कंटेंट रायटिंग कोर्स तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या कोर्समध्ये तुम्ही वेबसाइट, ब्लॉग आणि सोशल मीडियासाठी आकर्षक लेख लिहिण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकाल. कोर्समध्ये तुम्हाला एसइओ (SEO) लेखन, कॉपीरायटिंग आणि विविध प्रकारचे कंटेंट कसे लिहायचे याबद्दल सांगितले जाते.
3. डिजिटल मार्केटिंग (Career After 12th) (Digital Marketing)
या कोर्सच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा उत्पादन ऑनलाइन मार्केटमध्ये विकण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकू शकाल. यामध्ये तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), कंटेंट मार्केटिंग आणि ईमेल मार्केटिंग यासारख्या गोष्टी शिकवल्या जातात.
4. स्टॉक मार्केट (Stock Market)
शेअर मार्केटचे क्षेत्र गुंतागुंतीचे आणि अस्थिर आहे, पण एक छोटा स्टॉक मार्केट कोर्स तुम्हाला गुंतवणुकीच्या मूलभूत गोष्टी शिकण्यास मदत करू शकतो. या कोर्समध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीबद्दल, शेअर चार्ट कसे वाचावे आणि गुंतवणूक धोरण कसे तयार करायचे याबद्दल शिकू शकता.
डेटा सायन्स (Data Science)
डेटा सायन्स हे खूप वेगाने वाढणारे क्षेत्र आहे आणि (Career After 12th) आजकाल चांगल्या डेटा सायंटिस्टना खूप मागणी आहे. एक लहान डेटा सायन्स कोर्स तुम्हाला डेटा विश्लेषणाच्या मूलभूत गोष्टी, पायथन (Python) आणि आर सारख्या प्रोग्रामिंग भाषा आणि मशीन लर्निंगची ओळख करून देऊ शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com