करिअरनामा ऑनलाईन । 12 वीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर (Career After 12th) करायचं या प्रश्नावर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर इथे मिळेल. 12 वी नंतर काय करायचे यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे होम सायन्स होय. तुम्ही जर होम सायन्समधील विविध कोर्सला प्रवेश घेवून अभ्यास केला तर तुम्हाला नोकरी आणि व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी मिळू शकते.
12 वी नंतर होम सायन्समध्ये करता येईल पदवी आणि डिप्लोमा
होम सायन्समध्ये शिक्षण घेण्यासाठी पदवी आणि डिप्लोमा हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमात पदवी शिक्षण 3 ते 4 वर्षांची असते आणि डिप्लोमा 1 वर्षांचा आहे. शासकीय (Career After 12th) महाविद्यालयांत प्रवेश घेतल्यास अत्यंत कमी फीमध्ये शिक्षण पूर्ण करता येऊ शकतं. जर तुम्हाला होम सायन्समध्ये आवड असेल तर जवळच्या कुठल्याही शासकीय महाविद्यालयांमध्ये जाऊन याविषयी सविस्तर माहिती घेवून तुम्ही तुमचं प्रवेश निश्चित करू शकता.
होम सायन्समधील विविध कोर्स (Career After 12th)
होम सायन्समध्ये अनेक कोर्सेस आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी देखील उपलब्ध आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. होम सायन्स मध्ये 5 मुख्य शाखा आहेत; त्या पुढीलप्रमाणे…
1. फूड अँड न्यूट्रिशन
2. ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजेच मानव विकास
3. क्लोजिंग अँड टेक्सटाईल म्हणजेच वस्त्र शास्त्र
4. होम मॅनेजमेंट
5. एक्सटेन्शन एज्युकेशन अर्थात विस्तार शिक्षण या पाच शाखांचा यामध्ये अभ्यास करता येतो. या पाचही शाखांमध्ये तुम्ही प्रवेश घेऊन तुमचं करिअर करू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com