करिअरनामा ऑनलाईन । 10 वी आणि 12 वी चा टप्पा हा आयुष्यातील (Career After 10th and 12th) सर्वात महत्वाचा टप्पा समजला जातो. 10 वी आणि 12 वीनंतर काय करावे? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांपुढे असतो. जर तुम्हाला डिप्लोमामध्ये आवड असेल तर तुम्ही 10वी किंवा 12 वीनंतर पॉलिटेक्निक म्हणजेच तंत्रनिकेतनमध्ये प्रेवश घेऊन चांगली नोकरी मिळवू शकता. तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासाठी प्रवेश कसा घ्यायचा? इथे कोणकोणते कोर्सेस करता येतात? तसेच नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? याविषयी सविस्तर जाणून घेवूया….
तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रकिया
– 10 वी आणि 12 वीनंतर तुम्ही पॉलिटेक्निकला प्रेवश घेऊ शकता.
– दहावीनंतर जर तुम्ही पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला तर तुम्हाला तीन वर्षे कालावधीचा कोर्स करावा लागतो. हा डिप्लोमा असतो. (Career After 10th and 12th)
– पॉलिटेक्निकसाठी सर्व प्रेवश प्रकिया ऑनलाइन पद्धतीनेच होते.
– तुम्ही पॉलिटेक्निकच्या गव्हर्मेंटच्या वेबसाईट वर जावून रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचा फॉर्म भरू शकता.
– तसंच तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या एफसीमध्ये जाऊन देखील रजिस्ट्रेशन करू शकता आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता.
– 25 जून पर्यंत पॉलिटेक्निकसाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
– त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर प्रेवश प्रकिया सुरू होईल.
फी किती? (Career After 10th and 12th)
पॉलिटेक्निक करण्यासाठी तुम्हाला अत्यंत कमी फी भरावी लागते.
1. जर तुम्ही खुल्या वर्गात येत असाल तर तुम्हाला 7,750 एवढी फी असेल.
2. जर तुम्ही ओबीसी किंवा ईडब्ल्यूएसमध्ये येत असाल तर तुम्हाला 4750 फी असेल.
3. एससी, एस्टी, आणि व्हीजेनटीसाठी 1750 एवढी फीस असेल.
अशा आहेत नोकरीच्या संधी
पॉलिटेक्निक नंतर तुमच्यासाठी अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये नोकरी करू शकता. तसेच तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. यासह तुम्ही 12 वीनंतर देखील या पॉलिटेक्निकमध्ये प्रेवश घेऊ शकता. तुम्हाला यामध्ये दोन वर्षचा डिप्लोमा करता येतो. बारावीनंतर (Career After 10th and 12th) तुम्ही प्रवेश घेतला तरी देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी मिळतात. यासोबतच तुम्ही पुढील शिक्षण घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल ब्रांच, कॉम्प्युटर ब्रांच, सिविल ब्रांच, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, ए आय ब्रांच, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल ब्रांच अशा विविध शाखेमध्ये प्रवेश घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com