Business Success Story : फॅशनच्या दुनियेतील चमकता तारा रितू कुमार; 50 हजारांच्या भांडवलातून करोडोंची कमाई

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत (Business Success Story) आहेत. एवढच नव्हे तर पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही महिला चमकदार कामगिरी करत आहेत. जर आपण फॅशन डिझायनिंगबद्दल बोललो, तर भारतात असे अनेक फॅशन डिझायनर्स आहेत, ज्यांच्या डिझायनिंगने देशातच नाही तर परदेशातही धूम केली आहे. भारतीय महिला फॅशन डिझायनर्स प्रत्येक प्रकारच्या स्पर्धेत उतरत आहेत; त्यापैकीच एक आहेत रितू कुमार…

रितू कुमार ही पहिली भारतीय महिला फॅशन डिझायनर आहे ज्यांनी भारतीय संस्कृतीला नव्या रूपात प्रस्थापित करून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली आहे. त्या केवळ प्रसिद्ध लोकांसाठीच नाही तर मध्यमवर्गीयांनाही ध्यानात ठेवून कपडे डिझाइन करतात; जेणेकरून लोकांना त्यांनी बनवलेले कपडे सहज खरेदी करता येतील.

Success Story Ritu Kumar

50 हजारात सुरु केला व्यवसाय (Business Success Story)

रितू कुमार यांनी अवघ्या 50 हजार रुपयांच्या भांडवलावर आपला व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांची कमाई करोडोंमध्ये आहे. देशभरात तिची दुकाने आहेत. सुरवातीला कोलकात्याच्या एका छोट्याशा शहरात 4 हँड प्रिंटर आणि 2 ब्लॉक्सच्या मदतीने तीने आपले काम सुरू केले. त्यावेळी आपल्याला इतकं यश मिळेल याची कल्पनाही त्यांना  नव्हती.

Success Story Ritu Kumar

मोठ-मोठ्या अभिनेत्रींनी केला रितूसाठी रॅम्प वॉक

रितू कुमार यांच्या आउटफिट्स अनेक फॅशन शोमध्ये आकर्षण ठरल्या आहेत. इतकेच नाही तर अदिती राव हैदरी, निम्रत कौर, दिव्या खोसला, तापसी पन्नू, वाणी कपूर, क्रिती सेनॉन (Business Success Story) आणि दिशा पटानी यांसारख्या अभिनेत्रींनी त्यांच्यासाठी रॅम्प वॉक केला आहे.

Success Story Ritu Kumar

अमृतसरची रहिवासी रितू (Business Success Story)

रितू कुमार यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे 11 नोव्हेंबर 1944 रोजी झाला. त्यांनी दिल्लीतून शिक्षण घेतले आहे. दिल्लीच्या लेडी इर्विन कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या.

Success Story Ritu Kumar

कंपनीचा टर्न ओव्हर

रितू यांनी 1960 आणि 70 च्या दशकात लग्नातील वधूचा पोषाख आणि संध्याकाळची कपडे डिझाईन करायला सुरुवात केली. नंतरच्या दोन दशकांत त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केला. त्यांच्या कंपनीने पॅरिस, लंडन आणि न्यूयॉर्कमध्येही शाखा उघडल्या आहेत. लंडनची शाखा (Business Success Story) तीन वर्षांनी म्हणजे 1999 मध्ये बंद झाली. त्यावेळी त्यांच्या  कंपनीची वार्षिक उलाढाल कोणत्याही भारतीय फॅशन आउटलेटपेक्षा सर्वाधिक म्हणजेच अंदाजे INR 10 अब्ज इतकी होती. नंतर 2002 मध्ये त्यांनी मुलगा अमरिशसोबत ‘लेबल’ ब्रॅंड लाँच केला जो चांगलाच नावारुपाला आला.

Success Story Ritu Kumar

रितू यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही

फॅशन इंडस्ट्रीतील कामगिरीसोबतच त्यांनी विविध पुरस्कारही जिंकले आहेत. त्यांना 2013 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. नंतर त्यांनी L’Oreal Paris Femina Women’s Awards पुरस्कार जिंकला. रितू यांनी त्यांच्या कलेतील ज्ञानाचा उपयोग केला आणि त्यावर आधारित फॅशनचे साम्राज्य उभे केले. रितू सांगतात; ज्ञान इतर कोणत्याही प्रतिभेइतकेच महत्त्वाचे आहे. तुमची कौशल्ये (Business Success Story) योग्यरित्या तयार करण्यासाठी तुम्हाला त्या क्षेत्राचे ज्ञान आवश्यक आहे. शिक्षण हे अत्यावश्यक नसले तरी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असू शकतो. तुमच्यातील क्षमता तुम्हाला एक व्यापक दृष्टिकोन देते ज्याद्वारे तुम्ही जग पाहू शकता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com