करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही कधी कोंबडीच्या पिसांचा व्यवसाय करताना कोणाला बघितलं (Business Success Story) आहे का? नाही ना? पण अशी व्यक्ती आहे. ज्यांनी कोंबडीच्या पिसांचा उपयोग करून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.
असं म्हणतात की नशीब बदलण्यासाठी एक लहानातील लहान गोष्टही पुरेशी असते. अगदी विमानापासून ते रेती विकण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये पैसे कमवता येतात. अशाच एका बिझनेस आयडियाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या बिझनेस आयडियाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. आजपर्यंत तुम्ही चिकन किंवा कोंबडीचा व्यवसाय करताना लोकांना बघितले असेल. पण तुम्ही कधी कोंबडीच्या पिसांचा व्यवसाय करताना कोणाला बघितलं आहे का? नाही ना? पण अशी व्यक्ती आहे. ज्यांनी कोंबडीच्या पिसांचा उपयोग करून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.
कोंबडीच्या पिसांपासून बनवले कपडे (Business Success Story)
तुम्ही कधी विचार केला आहे का की कोंबडीच्या पिसांपासूनही कपडे बनवता येतात… कदाचित नसेल पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका यशोगाथेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये काही लोकांनी कोंबडीच्या पिसांपासून कपडे बनवून करोडोंचा उद्योग उभारला आहे.
कोटींमध्ये खेळणारी कंपनी
जयपूर येथील रहिवासी असलेल्या मुदिता आणि राधेश यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. दोघांनाही कॉलेजमध्ये असताना ही कल्पना सुचली. त्यानंतर दोघांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला आणि करोडोंचा व्यवसाय केला. आज त्यांच्या कंपनीची उलाढाल खूप जास्त आहे. या (Business Success Story) लोकांनी त्यांच्या कंपनीचे नाव मुदिता अँड राधेश प्रायव्हेट लिमिटेड असे ठेवले आहे. राधेश सांगतात की, त्यांनी हे काम 16,000 रुपयांपासून सुरू केले, पण आता त्यांची कंपनी करोडोंचा व्यवसाय करत आहे. गेल्या अडीच वर्षांत कंपनीने 7 कोटींचा व्यवसाय केला असून, सध्या कंपनीची वार्षिक उलाढाल अडीच कोटींची आहे.
8 वर्षे घेतले श्रम
या दोघांना स्वतःचे फॅब्रिक बनवून ते तयार करण्यासाठी सुमारे 8 वर्षे लागली आहेत. त्यामागे त्यांनी अथक परिश्रम करून खूप संशोधन करून पिसांपासून कापड तयार केले आहे.
परदेशात मोठी मागणी
मुदिता यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, तिच्याकडे सध्या भारतातील फारसे ग्राहक नाहीत कारण भारतातील लोक कोंबडीच्या पिसांपासून बनवलेले फॅब्रिक वापरणे टाळतात, परंतु परदेशात त्याला खूप मागणी आहे. या फॅब्रिकपासून बनवलेली उत्पादने परदेशात वापरली जातात. त्यामुळे परदेशी ग्राहक डोळ्यासमोर ठेवून उत्पादन घेतले जाते.
कुटुंबीयांनी दिला नकार
राधेशचं कुटुंब स्वतः पूर्णपणे शाकाहारी असल्याने तो कुटुंबाशी या प्रकल्पाविषयी बोलला तेव्हा कुटुंबीयांनी त्याला नकार दिला. ते म्हणाले की. हे घाणेरडे काम आहे. अशुद्ध वस्तूंना ते कसे हात लावू शकतात. काम प्रगतीपथावर असतानाही कुटुंबाने राधेशला साथ दिली नाही. त्यांना आर्थिकदृष्ट्या (Business Success Story) दूरच पण कुटुंबाकडून भावनिक आधारही मिळाला नाही. कॉलेजमध्ये प्रोजेक्टवर काम करत असताना त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. राधेश आणि मुदिता यांना स्वतःचे फॅब्रिक बनवण्यासाठी सुमारे 8 वर्षे लागली. 2010 पासून सुरू झालेला हा उपक्रम 2018 मध्ये पूर्ण झाला. यासाठी खूप मेहनत आणि अभ्यास करावा लागल्याचे राधेशनं सांगितले. असे फॅब्रिक याआधी कोणीही बनवले नसल्याने, पुस्तकांत आणि इंटरनेटवरही त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. खूप संशोधनानंतर त्याला कोंबडीची पिसे साफ करण्याची पद्धत सापडली.
शिक्षकही होते नाराज
राधेश आणि मुदिता यांना कॉलेजच्या काळापासूनच आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांचे बहुतेक शिक्षक आणि प्राध्यापक त्यांच्या कामावर खूश नव्हते. कोंबडीच्या पिसांवर काम केल्यामुळे त्यांनी याला गलिच्छ काम म्हटले आणि त्यांना मदत करण्यास नकार दिला. अनेक शिक्षकांनी राधेशला परीक्षेत नापासही केले. कॉलेज संपल्यानंतर माझ्या थिअरीला प्रॅक्टिकल रुप देणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं.
अनेक आव्हांनाचा केला सामना
राधेश सांगतो की, फंडपासून साफसफाईचे प्लांट लावणे, विणकर शोधणे, त्यांना काम करायला लावणे. त्यांना काम शिकवणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि अंतिम उत्पादन बाजारात आणणे अशा आव्हानांना तोंड देत त्यांनी कंपनी तयार केली आहे. केवळ आव्हानच नाही, तर अशी अनेक माणसे आणि परिस्थितीही आली जी त्यांच्या बाजूनेही होती असं या दोघांनी सांगितलं आहे.
आणखी रोजगार निर्माण करण्याचे ध्येय
सध्या सुमारे 1200 कामगार कोंबडीच्या पिसांपासून उत्कृष्ट कापड बनवण्याचे काम करतात. राधेश आणि मुदिता सांगतात की इथे प्रत्येक विणकर महिन्याला (Business Success Story) 8 ते 12 हजार रुपये कमावतो. आज बहुतेक कंपन्या यंत्रांकडे वळल्या आहेत त्यामुळे विणकरांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे मुदिता आणि राधेश यांनी अधिकाधिक विणकरांना सहभागी करून घेण्याचे आणि हातमागावर काम करणाऱ्या कामगारांना समाजात त्यांचे स्थान देण्याचे ध्येय ठेवले आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com