करिअरनामा ऑनलाईन । उद्योजकतेच्या क्षेत्रात काही व्यक्ती (Business Success Story) सर्व अडथळे पार करून यशाच्या मार्गावर पुढे जात राहतात. मीरा कुलकर्णी या ‘फॉरेस्ट एसेंशियलच्या’ दूरदर्शी संस्थापक आणि सीएमडी आहेत. हे उत्पादन भारतातील एक प्रसिद्ध नैसर्गिक सौंदर्यप्रसाधन ब्रँड आहे. मीरा यांचा प्रतिकूलतेपासून विजयापर्यंतचा उल्लेखनीय प्रवास जगभरातील महत्त्वाकांक्षी उद्योजकांसाठी प्रेरणा देणारा आहे.
मीरा कुलकर्णी (Meera Kulkarni) यांनी आपल्या आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना केला. वयाच्या ४५व्या वर्षी त्यांनी मेणबत्त्या आणि हाताने साबण बनवण्याचा छंद जोपासला; जो छंद पुढे जाऊन एक मोठा उद्योग बनला. २४ वर्षांपूर्वी मीरा यांनी फॉरेस्ट एसेन्शियल्स या कंपनीचा पाया घातला. मीरा यांनी आयुष्यातील सर्व अडथळ्यांवर मात करून स्वतःची दृढनिश्चयी स्त्री म्हणून ओळख निर्माण केली आहे.
कोण आहेत मीरा कुलकर्णी? (Business Success Story)
फॉरेस्ट एसेंशियलच्या संस्थापक आणि सीएमडी मीरा यांना यशाच्या प्रवासात अनेक अडथळे आले पण, त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. वयाच्या २८व्या वर्षी त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. मीरा कुलकर्णी यांनी दोन लाख रुपयांचा व्यवसाय सुरू केला ज्याचे मूल्यांकन आता १०,००० कोटी रुपये झाले आहे. फॉर्च्यून मासिकात ‘भारतातील ऊर्जा क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली महिला’ म्हणून मीरा यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
पतीच्या व्यसनाधीनतेमुळे लग्न मोडलं
अगदी कमी वयात मीरा यांचं लग्न झालं. त्यांच्या (Business Success Story) नवऱ्याला व्यवसायातील नुकसानीमुळे दारूचे व्यसन लागले. परिणामी दोघांचे लग्न मोडले. त्यानंतर मीरा आपल्या दोन मुलांसह आईच्या घरी परतल्या पण संकटांनी मीरा यांची पाठ सोडली नाही. त्या २८ वर्षाच्या असताना त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. वय कमी पण पदरात दोन मुले होती. कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी मीरा एकट्या लढत होत्या. त्यांनी कधीही हार मानली नाही. प्रत्येक आव्हानाला त्या धैर्याने तोंड देत होत्या.
छोट्या गॅरेजमधून सुरु केली कंपनी
मीरा यांच्या मुलीचं लग्न झालं त्यावेळी त्या 45 वर्षाच्या होत्या. मुलीच्या लग्नानंतर मीरा यांनी मेणबत्त्या आणि हाताने बनवलेला साबण बनवण्याचा छंद लागला. या छंदाचे नंतर व्यवसायात रूपांतर झाले. त्यांनी फॉरेस्ट एसेंशियलची स्थापना केली. फक्त दोन लाख रुपये गुंतवणूक आणि एका छोट्या गॅरेजमध्ये (Business Success Story) दोन कर्मचाऱ्यांसह त्यांनी व्यवसायाला सुरुवात करून मीरा यांनी नैसर्गिक घटकांवर लक्ष केंद्रित केले. आयुर्वेदाचा वापर करून त्यांनी बनवलेली उत्पादने लोकांच्या पसंतीस उतरली. मीरा यांना मेहनतीचे फळ मिळाले आणि व्यवसायात भरभराट झाली. आज फॉरेस्ट इसेन्शियल्सचा व्यवसाय देशभरातील २८ शहरांमध्ये पसरला आहे. मीरा या व्यवसायाचे कौशल्यतेने नेतृत्व करत आहेत.
2 लाख रुपयांची माफक गुंतवणूक आणि फक्त दोन कर्मचाऱ्यांच्या टीमसह मीरा यांनी गॅरेजमधील छोटेखानी कामाचे रूपांतर एका भरभराटीच्या उपक्रमात केले. आयुर्वेदाच्या समृद्ध वारशातून प्रेरणा घेऊन त्या टिहरी गढवाल प्रदेशातील स्वदेशी घटक काळजीपूर्वक तयार करतात आणि त्यांच्या उत्पादनांमध्ये निसर्गाच्या भेटवस्तूंचे सार घालतात.
भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक महिला
अनेक वर्षांपासून फॉर्च्यून मासिकाने ‘भारतातील (Business Success Story) व्यवसायातील सर्वात शक्तिशाली महिला’ ही पदवी देवून मीरा यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेतली आहे. शिवाय कोटक वेल्थ हुरून – अग्रगण्य श्रीमंत महिला 2020 च्या अहवालानुसार त्यांना 1,290 कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक म्हणून स्थान देण्यात आले आहे.
२००८ मध्ये मीरा यांनी द एस्टी लॉडर कंपन्यांनी फॉरेस्ट एसेन्शियल्समधील भाग भांडवल विकत घेऊन महत्त्वपूर्ण भागीदारी केली तर ग्रँड हयात आणि ताज यासारख्या प्रतिष्ठित हॉटेल्सच्या सहकार्याने ब्रँडची प्रतिष्ठा आणखी वाढवली. कोटक वेल्थ हुरूनच्या २०२० नुसार मीरा यांची एकूण संपत्ती १,२९० कोटी रुपये आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com