Business Success Story : घरोघरी पेन विकून शिक्षण पूर्ण केलं; एक आयडिया अन् नशीब पालटलं; आज त्यांची कंपनी करते कोटीत उलाढाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शाळेचा खर्च झेपत नव्हता. शिक्षण (Business Success Story) थांबवायचं नव्हतं म्हणून त्यांनी पेन विकायला सुरुवात केली. एक काळ असा होता ज्यावेळी ते बसमध्ये आणि घरोघरी जावून पेन विकायचे. यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. पण दिवस पालटायला वेळ लागला नाही. एकेकाळी पेन विकणारी व्यक्ती आज हजारो कोटींच्या कंपनीची मालक बनली आहे. भारतातील ‘इन्व्हर्टर मॅन’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

म्हणतात ना, अडचणीशिवाय आयुष्य नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात अडचणी येत असतात. पण या अडचणीवर मात केली तर निश्चितपणे मोठे यश मिळू शकते. जगात असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या आयुष्यात अडचणी आल्या की धीर सोडतात. त्यांना सर्व काही संपल्यासारखे वाटते. परंतु असे अनेक लोक आहेत जे मोठ्या अडचणींनाही धैर्याने सामोरे जातात आणि यश मिळवतात. त्यापैकीच एक आहेत कुंवर सचदेव…
आम्ही बोलत आहोत Su-Kam कंपनीचे संस्थापक कुंवर सचदेव यांच्याविषयी. त्यांच्या कंपनीत तयार होणाऱ्या सोलर उत्पादनांना केवळ भारतातच नाही तर परदेशातही मोठी मागणी आहे. पण त्यांच्यासाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पेन विकले (Business Success Story)
कुंवर सचदेव यांनी प्राथमिक शाळेपर्यंतचे शिक्षण खासगी शाळेत पूर्ण केले. त्यांनंतर त्यांना आर्थिक अडचणीमुळे पुढील शिक्षण सरकारी शाळेत पूर्ण करावे लागले. कुंवर यांना डॉक्टर व्हायचे होते. पण मेडिकलची प्रवेश परीक्षा पास न झाल्यामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. त्याकाळी कुंवर यांनी अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी घरोघरी जावून, बसचे धक्के घेत पेन विकले होते.
असा सुरु झाला व्यवसाय 
शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका केबल कम्युनिकेशन कंपनीच्या मार्केटिंग विभागात कुंवर नोकरी करू लागले. देशातील केबल व्यवसाय भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकेल असे त्यांना वाटले. नोकरी सोडून त्यांनी यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कुंवर सचदेव यांनी Su-Kam कम्युनिकेशन सिस्टीम या नावाने व्यवसायास सुरुवात केली.

या कल्पनेतून सुरु केली इन्व्हर्टर कंपनी
लाईट गेल्यानंतर बॅक अपसाठी घरोघरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी इन्व्हर्टरचा वापर होतोच. कुंवर यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या घरात इन्व्हर्टर होता. जो सतत खराब व्हायचा. एक दिवशी (Business Success Story) दुरुस्तीसाठी त्यांनी तो इन्व्हर्टर स्वतः उघडला तेव्हा त्यांना समजले की ही समस्या खराब क्वालिटीच्या सामानामुळे निर्माण झाली आहे. यानंतर कुंवर यांनी स्वतः इन्व्हर्टर बनवण्याचा विचार केला आणि 1998 मध्ये त्यांनी Su-Kam पॉवर सिस्टम नावाची कंपनी स्थापन केली आणि इन्व्हर्टर बनवण्यास सुरुवात केली.

आज आहेत करोडोच्या कंपनीचे मालक
कुंवर सचदेव आज सुमारे 2300 कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या कंपनीत सोलर प्रोडक्ट तयार केली जातात. ही उत्पादने दिवसातील 10 तास वीज देऊ शकतात. एका अहवालानुसार त्यांची उत्पादने आतापर्यंत भारतातील एक लाखाहून अधिक घरांमध्ये बसवण्यात आली आहेत. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या उत्पादनांना मोठी मागणी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com