Business Success Story : परिक्षेत अनेकवेळा नापास; गणितात मिळायचा 1 मार्क; कोणी नोकरीही देत नव्हतं; पण उभारली लाखो कोटींची कंपनी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । चीनच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर आणि (Business Success Story) इंटरनेट उद्योगावर जवळजवळ एकट्याने प्रभाव पाडणाऱ्या माणसाच्या जीवनाची कथा आज आपण पाहणार आहोत. अनेकवेळा आपण अपयशातून शिकतो, म्हणूनच असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. परंतु ज्यांना त्याचा अर्थ समजतो तेच जीवनात पुढे जावून असाध्य गोष्टी साध्य करतात. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका व्‍यक्‍तीची गोष्ट सांगणार आहोत, जी व्यक्ती शाळा, कॉलेज आणि नोकरीमध्‍ये अनेकवेळा अपयशी ठरली आहे. परंतु त्याने कधीही हार मानली नाही. आज त्याची कंपनी एक अब्ज डॉलरची कंपनी बनली आहे.

आम्ही बोलत आहोत चीनी अब्जाधीश आणि (Business Success Story) अलिबाबाचे संस्थापक ‘जॅक मा’ यांच्याविषयी. जॅक मा यांची कहाणी त्या प्रत्येक व्यक्तीला माहित असायला हवी जी आपल्या आयुष्यात निराश आहे किंवा अपयशामुळे नकारात्मक विचार करू लागली आहे. अशावेळी जॅक मा यांची कहाणी तुम्हाला नक्कीच नैराश्येतून बाहेर काढेल.

पेपरमध्ये अनेकवेळा नापास
जॅक मा यांचा जन्म 10 सप्टेंबर 1964 रोजी चीनच्या हांगझो प्रांतात झाला होता. जॅक अभ्यासात इतके हुशार नव्हते. ते  प्राथमिक शिक्षण घेत असताना शाळेत दोनवेळा नापास झाले होते. एवढंच नव्हे तर माध्यमिक शाळेत ते तीन वेळा नापास झाले. त्यांना एकदा गणिताच्या पेपरमध्ये 120 पैकी 1 मार्क मिळाला होता. विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत ते तीनवेळा नापास झाले होते.

शाळेत शिकवण्याचं काम केलं
जॅक मा यांनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेशासाठी एक दोन नव्हे तर 10 वेळा अर्ज केला होता. मात्र तेथे त्यांना प्रवेश मिळाला नाही. नंतर ते हांगझो नॉर्मल युनिव्हर्सिटीमधून पदवीधर झाले. त्यांनी इंग्रजीमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर ते शाळेत शिक्षक म्हणून काम करू लागले.

30 वेळा केलं रिजेक्ट
जॅक मा यांची नोकरी मिळवण्याची धडपड सुरु होती तेव्हा त्यांना 30 वेळा नकार मिळाला होता. एकदा त्यांनी नामवंत KFC ब्रॅंडमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यावेळी नोकरीसाठी (Business Success Story) अर्ज केलेल्या 24 लोकांपैकी 23 लोकांची निवड करण्यात आली होती, फक्त जॅक यांना यावेळी अपात्र ठरवण्यात आले.

वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी केली ‘अलीबाबा’ची पायाभरणी
जॅक मा यांनी त्यांच्या 17 मित्रांसह 1999 मध्ये ‘अलीबाबा’ची पायाभरणी केली. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी त्यांची पहिली कंपनी यशस्वीपणे सुरू झाली. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण लवकरच कंपनीने झपाट्याने प्रगती केली. जॅक मा जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स नेटवर्कपैकी एक चालवतात. कंपनीची वाढ पाहून त्यांना गुंतवणूकदार आणि कर्ज मिळू लागले. आज (Business Success Story) अलीबाबाचे मूल्यांकन 214.55 अब्ज डॉलर्स आहे आणि मार्केट कॅपच्या दृष्टीने ती 45 वी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. जॅक मा हे एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये होते. मात्र, 2019 मध्ये त्यांनी अलीबाबाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com