करिअरनामा ऑनलाईन । आशुतोष प्रतिहस्त या तरुणाची कौटुंबिक (Business Success Story) पार्श्वभूमी पहिल्यापासून चांगली होती त्यामुळे त्याच्या वडिलांनी कधीही नोकरी केली नाही. आशुतोष त्याच्या गावातील सर्वात मस्तीखोर मुलांपैकी एक होता. गावातील अनेकजण आशुतोषच्या आईला तुमचा मुलगा वाया गेल्याचं सांगायचे. तो आयुष्यात पुढे काहीही करू शकत नाही असंही गावकरी म्हणायचे. त्यामुळे आशुतोषची आई खचून जायची. आईचे नैराश्य बघून आशुतोषने काहीतरी करण्याचा निर्धार केला अन् त्याने तसं करुनही दाखवलं. आशुतोष आता कोट्यवधींचा व्यवसाय करतोय. त्याची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तो लहान असताना इतका मस्तीखोर होता, की त्याच्या मस्तीमुळे त्याच्या शेजारचे तसंच त्याचे आई-वडिलही खूप त्रस्त होते. त्यांचं काहीही भविष्य नसल्याचं अनेकजण म्हणायचे; पण याच आशुतोषची कहाणी तुम्हाला प्रेरणा देणार आहे.
आशुतोषच्या मस्तीमुळे आई नैराश्येत
आशुतोष प्रतिहस्त बिहारच्या सीतामढीतील रहिवासी आहे. आशुतोषची आई त्याच्यामुळे नैराश्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना या नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी येथील वातावरणातून बाहेर पडण्यास सांगितलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आशुतोषच्या वडिलांनी 2005 मध्ये दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला. तिथे गेल्यानंतर त्यांनी काही काळ काम केलं. त्यानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाला दिल्लीत बोलावलं. आशुतोषचा दिल्लीत आल्यानंतरही मस्तीखोरपणा तसाच होता. त्याच्या मनात जे येईल ते तो करायचा. त्याच्यामुळे त्याच्या वडिलांना अनेकदा आर्थिक नुकसान सोसावं लागलं आहे.
पैशांची किंमत कळू लागली
दिल्लीत आल्यानंतर आशुतोषला आसाममधील एका केंद्रीय विद्यालयात पाठवण्यात आलं. कारण तिथे फी कमी होती. त्यावेळी आशुतोषच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. आसामला (Business Success Story) गेल्यानंतर आशुतोषला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तो हिंदी बोलायचा, तर त्याच्या आजूबाजूचे लोक आसामची भाषा बोलत होते. त्यामुळे त्याचे मित्र त्याची खिल्ली उडवायचे. इथे एक वर्ष घालवल्यानंतर तो पुन्हा दिल्लीत आला. यादरम्याच्या काळात आषुतोषला पैशांची किंमत कळायला लागली होती.
‘श्रीमंत कसं बनायचं?’
आसाममधून दिल्लीत आल्यानंतर तो आई-वडिलांना श्रीमंत कसं बनायचं असा प्रश्न सतत विचारायचा. त्यावेळी त्याच्या आई-वडिलांनी त्याला श्रीमंत बनण्यासाठी चांगला अभ्यास करावा लागेल असं सांगितलं आणि त्यानंतर आशुतोषने शिक्षणात मन रमवले. सातवीत असताना त्याला चांगले गुण (Business Success Story) मिळाले आणि त्याच्याशी मैत्री न करणारे त्याचे मित्र त्याच्या जवळ आले. इथूनच त्याला शिक्षणाचे महत्व समजू लागले. त्याने 10 वीतदेखील चांगले गुण मिळवले आहेत तर 12 वीत त्याने 92 टक्के गुणांची कमाई केली आहे.
अचानक वडिलांची नोकरी गेली
10 वीत चांगले गुण मिळाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी त्याला गिटार घेऊन दिलं होतं. त्याला काही दिवसांत गिटार वाजवायला येऊ लागलं. त्याचदरम्यान आशुतोषच्या वडिलांची नोकरी गेली. त्यांची परिस्थिती इतकी खराब झाली, की त्यांना कर्ज घेऊन घर चालवावं लागत होतं.
आर्थिक कमाईसाठी घेतले गिटार क्लास
आशुतोषला आपलं घर सावरायचं होतं. कुटुंबाला आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्याचं त्याने ठरवलं. तोपर्यंत तो उत्तमप्रकारे गिटार वाजवायला शिकला होता. त्याने कुटुंबाला (Business Success Story) आर्थिक मदत करण्यासाठी गिटारचे क्लास घेण्यास सुरुवात केली. त्या क्लासमधून तो महिन्याला 6 हजार रुपये कमाई करत होता. त्यानंतर त्याने 12वीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याला 12वीत 92 टक्के मिळाले. बारावीनंतर त्याने दिल्ली विद्यापीठाच्या मोतीलाल नेहरू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
स्वत:च्या स्टार्टअप मधून कोट्यावधी कमावले
आशुतोषवर अनेक जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे पैसे कमावण्यासाठी त्याने कॉल सेंटरपासून ते इतर अनेक ठिकाणी नोकरी केली. श्रीमंत बनण्याचं लहानपणीचं त्याचं स्वप्न आजही कायम होतं. आशुतोषने कॉलेजनंतर एज्युकेशन – टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म सुरु केला. याचं नाव ‘IDigitalPreneur’ असं आहे. स्टार्टअप सुरु केल्यापासून केवळ 11 महिन्यातच त्याची ही कंपनी कोट्यवधींची झाली आणि त्याचं लहानपणीचं स्वप्न सत्यात उतरलं.
काय आहे ‘IDigitalPreneur’चे काम (Business Success Story)
आशुतोष त्याच्या ‘IDigitalPreneur’ प्लॅटफॉर्मवर अशा स्किल्स शिकवतो ज्या आपण आपल्या प्रोफेशनल लाइफमध्ये वापरु शकतो. तसंच हे स्किल्स शिकून सर्वसामान्य लोक त्यातून पैसेही कमावू शकतात. हे सर्व स्किल्स तो अतिशय कमी किमतीत शिकवतो. त्याशिवाय आशुतोषचं प्रतिहस्त नावाने एक यूट्यूब चॅनलही आहे. या चॅनलवर तो फायनेंशियल एज्युकेशनसंबंधीत व्हिडिओ शेअर करतो; या व्हिडिओजना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com