Business Success Story : भेटा अशा IIT ग्रॅज्युएटला ज्याने कपडे धुण्यासाठी 84 लाख रुपयांची नोकरी सोडली, उभारली 100 कोटींची कंपनी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुमचं ध्येय निश्चित असेल तर यशाच्या (Business Success Story) वाटेत आलेल्या अडचणीही तुम्ही सहज पार करु शकता. अशीच एक यशोगाथा आहे बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या अनुराभ सिन्हा यांची. त्यांच्या कुटुंबाकडे शिक्षणाची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते. पण ही समस्या त्यांच्या यशाच्या मार्गात कधीही अडथळा बनली नाही. जिद्दीला पेटलेल्या या तरुणाने बिहार सोडून मुंबईत जाऊन शिक्षण घेतले आणि नंतर लाखो रुपये पगाराची नोकरीही मिळवली. पण अनुराभला आयुष्यात वेगळं काहीतरी करून दाखवायचं होतं. मनात दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणाऱ्या या तरुणाने यशाचं शिखर कसं गाठलं याविषयी आज जाणून घेवूया…

पत्नीसोबत सुरू केला व्यवसाय (Business Success Story)
अनुराभ सिन्हा यांचे आज सर्वात वेगाने वाढणाऱ्या व्यवसायिकांच्या यादीत नाव घेतले जाते. त्यांनी पत्नी गुंजन सिन्हा यांच्यासोबत लॉन्ड्रीचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांच्या कंपनीने 110 कोटी रुपयांचे मार्केट कॅप गाठले. त्यांचा व्यवसाय केवळ भारतातच नाही तर जगातील सुमारे अर्धा डझन देशांमध्ये पसरलेला आहे. पण अनुराभला इथपर्यंत पोहचणे सोपे नव्हते. आज त्यांच्या कारकिर्दीची जी चमक निर्माण झाली आहे ती अडचणींच्या आणि ध्यासाच्या भट्टीत तयार झाली आहे.

IIT मधून अभ्यास आणि नोकरीत मिळवले लाखांचे पॅकेज
अनुराभा सिन्हा यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात आपण ध्येयांबद्दल किती जागरूक आहोत हे दाखवून दिले आहे. त्यांनी इयत्ता 8 वीत शिकत असतानाच आयआयटीमध्ये (IIT) प्रवेश मिळवण्यासाठी तयारी सुरू केली. अखेरीस त्यांनी आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेतला आणि येथून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यांची फी भरण्यासाठी कुटुंबाकडे पैसे नव्हते. कसेबसे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि IIT मधून बाहेर पडल्यानंतर लाखांचे पॅकेज मिळवले.

अशी सुचली व्यवसाय सुरू करण्याची कल्पना
IIT मधून शिक्षण घेतल्यानंतर या गुणवत्तेवर अनुराभ यांना देशात लाखोंच्या पॅकेजची नोकरी मिळाली होती. यानंतर अनुराभ नोकरीसाठी परदेशात गेले. 2015 मध्ये गुंजनसोबत त्यांचे (Business Success Story) लग्न झाले. यानंतर त्यांनी फ्रँग्लोबल हा पहिला उपक्रम सुरू केला आणि नंतर तो एका फ्रँचायझीला विकला आणि हॉस्पिटॅलिटी म्हणजेच हॉटेल उद्योगात काम करायला गेला. त्यांनी ट्रायबो हॉटेल्समध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि उत्तर भारतातील अनेक हॉटेल्समध्ये काम केले. येथूनच स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली.

व्यवसाय सुरू करण्यासाठी 84 लाखाची नोकरी सोडली
अनुराभने आता स्वतःचा व्यवसाय करायचा ठरवला होता. यासाठी त्यांनी परदेशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली. ते जिथे नोकरी करत होते तिथे त्यांना वार्षिक पॅकेज 84 लाख रुपये प्रती महिना मिळत होते. अनुराभ आणि त्यांची पत्नी गुंजन या दाम्पत्याने 2017 मध्ये 20 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ‘UClean’ नावाने लाँड्री व्यवसाय सुरू केला.

‘UClean’ चा देशासह परदेशातही विस्तार (Business Success Story)
आज ही कंपनी 110 कोटी रुपयांची झाली आहे. त्यांच्या UClean ने हैदराबाद आणि पुण्यात आपला व्यवसाय विस्तारला आहे. आज त्यांचे देशातील 104 शहरांमध्ये 350 हून अधिक स्टोअर्स आहेत. एवढेच नाही तर बांगलादेश, नेपाळ, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील काही देशांमध्येही त्यांचा व्यवसाय पसरला आहे. त्यांना अनेकजण ‘आयआयटी लाँड्रीवाला’ असेही म्हणतात. त्यांची लाँड्री भारताच्या व्यवसाय इतिहासात 200 फ्रँचायझी तयार करणारी सर्वात वेगवान कंपनी बनली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com