करिअरनामा ऑनलाईन । अनेकजण आपला व्यवसाय उभारण्यासाठी (Business Success Story) जिवतोड मेहनत घेतात. परंतु यामध्ये सर्वच यशस्वी होतात असे नाही. समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी त्यांच्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून व्यायवसाय सुरू केला आणि यामध्ये ते यशस्वी झाले आहेत. यापैकीच एक उदाहरण म्हणजे अहाना गौतम (Ahana Gautam). या तरुणीने वयाच्या 30 व्या वर्षी तिचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, नोकरी सोडली आणि एक स्टार्टअप तयार केला. आता ती 100 करोड टर्नओव्हर असलेल्या कंपनीचं नेतृत्व करते.
व्यवसाय सुरू करण्यासाठी अमेरिकेतील नोकरी सोडली (Business Success Story)
आयआयटीमधून (IIT) शिक्षण घेतल्यानंतर लाखोंमध्ये पॅकेज देणारी नोकरी मिळवणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. अहाना गौतम हीला आयआयटीमधून शिक्षण घेवून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेत गल्लेगठ्ठ पगाराची नोकरी मिळाली होती. मात्र तिने ही नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मुलांप्रमाणे मुलीसुद्धा वंशाचे नाव उंचावू शकतात हे दाखवून देणारे अलीकडचे उत्तम उदाहरण म्हणजे अहाना गौतम.
उच्च शिक्षण आणि नोकरी
अहाना गौतमने आयआयटी बॉम्बेमधून (IIT Bombay) केमिकल इंजिनिअरींग पदवी पूर्ण केल्यानंतर ती अमेरिकेत गेली. तिने 2014 ते २०१६ या कालावधीत हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून (Business Success Story) एमबीए केले. त्यानंतर, तिने प्रॉक्टर अँड गॅम्बल (P&G) मध्ये चार वर्षे काम केले आणि जनरल मिल्समध्ये विविध पदांवर काम केले.
स्टार्टअपसाठी आईने दिले भांडवल
अलिकडच्या काळात अनेक तरुण-तरुणी नोकरी सोडून वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. या व्यवसायाच्या माध्यामातून बक्कळ नफा कमवत आहेत. अहानानेही याच कारणाने तिची चांगली पगाराची नोकरी सोडली आणि ती अमेरिकेतून भारतात परतली. अहानाने सांगितले की, तिच्या (Business Success Story) आईने तिला कंपनी सुरू करण्यासाठी सुरुवातीला भांडवल दिले. अहानाने २०१९ मध्ये ओपन सिक्रेट नावाचे आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थ देणारी कंपनी सुरू केली. तिच्या कंपनीचा टर्नओव्हर 100 करोड आहे आणि या कंपनीचं ती नेतृत्व करते.
अहाना गोदरेज टायसन फूड्स लिमिटेडच्या स्वतंत्र मंडळाची संचालक देखील आहे. भारतात गेल्या दशकात स्टार्टअप कल्चर वेगाने वाढत आहे. अनेक तरुणांनी चांगल्या नोकऱ्या सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. तरुण उद्योजकांच्या या लिस्टमध्ये अहाना गौतमचं नाव सामील झालं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com