British Council Scholarship for Women : खास महिलांसाठी ब्रिटिश कौन्सिलची स्कॉलरशीप जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ब्रिटिश दूतावासाच्या वतीने (British Council Scholarship for Women) महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ब्रिटनच्या विद्यापीठांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ही स्टेम शिष्यवृत्ती असेल. या शिष्यवृत्तीमुळे महिलांसाठी उच्च शिक्षणाची मोठी संधी निर्माण झाली आहे.

ब्रिटिश दूतावासाच्या वतीने जगभरातील महिलांसाठी ही विशेष शिष्यवृत्ती घोषित करण्यात आली आहे. “संशोधन आणि नवनिर्मितीत महिलांची संख्या वाढावी म्हणून ब्रिटिश दूतावासाच्या वतीने ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे;” अशी माहिती एज्युकेशन इंडियाच्या संचालक रित्तिका चंदा यांनी दिली आहे.

प्रवेश कुठे घेता येणार – (British Council Scholarship for Women)
या शिष्यवृत्तीसाठी ब्रिटनमधील क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी, ग्रीनविच युनिव्हर्सिटी, द युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टन आणि कोव्हेंट्री युनिव्हर्सिटी या विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येणार आहे.
या सवलती मिळणार –
शिष्यवृत्तीमध्ये शैक्षणिक शुल्क, स्टायपेंड, प्रवास खर्च, व्हिसा, आरोग्य विमा यांचा समावेश असेल.
कोणता अभ्यासक्रम निवडू शकता –
स्कॉलर्स डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, फार्मास्युटिकल सायन्स, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, सिव्हिल इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, इंटेलिजंट हेल्थकेअर आदी अभ्यासक्रम विद्यार्थी निवडू शकतात. (British Council Scholarship for Women)
ब्रिटिश दूतावासाच्या वतीने भारत किंवा दक्षिण आशियातील विद्यार्थिनींसाठी 25 टक्के शिष्यवृत्ती राखीव असणार आहे.

देशातील विज्ञान तंत्रज्ञानात महिलांचे योगदान असे आहे
1. संशोधन किंवा नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण – 27 टक्के
2. या क्षेत्रात पदवीधरांमध्ये महिलांचे प्रमाण – 43 टक्के
शिष्यवृत्तीबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट – https://www.britishcouncil.in/study-uk/scholarships
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com