Breaking News : MPSC च्या विद्यार्थ्यांना खुशखबर!! आयोगाकडून पदसंख्येत वाढ; नेमक्या किती जागांसाठी होणार भरती??

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या पदसंख्येतील (Breaking News) वाढीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण 623 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत वेबसईट वर दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित राज्यसेवा पूर्व परीक्षेकरिता दिनांक 11 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शासनाच्या मागणीनुसार भरावयाच्या एकूण 161 पदांचा समावेश करण्यात आला होता. जाहिरातीमध्ये अंतर्भूत (Breaking News) पदांव्यतिरिक्त काही नवीन संवर्गातील पदाकरीता शासनाकडून सुधारित अतिरिक्त मागणीपत्र प्राप्त झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल, असे जाहिरातीद्वारे स्पष्ट करण्यात आले होते.

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 करीता दिनांक 11 मे 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर या परीक्षेकरीता नवीन 462 पदाचे अतिरिक्त मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. राज्यसेवा (Breaking News) पूर्व परीक्षा 2022 करीता जाहीर केली 161 पदे तसेच अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त 462 पदे विचारात घेऊन परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 623 पदाचा तपशील आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आला आहे.

  • वाढीव 623 पदांचा तपशील पुढे देण्यात आला आहे – CLICK

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com