नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पुणे प्रतिनिधी । मल्टिनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी अशी एसटी बसेस, सार्वजनिक ठिकाणे, वर्तमानपत्रांतून जाहीरात करून सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या टोळीत उस्मानाबाद येथील एका तरुणीचाही समावेश आहे.

अंकुश रावसाहेब मलगुंडे (वय 28, रा. ढोकसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे), साहिल सतीश कोकरे (वय 20, रा. भटेवाडी, ता. जामखेड, जि. नगर), महेश रमेश काळे (वय 21, रा. माहिजळगाव, ता. कर्जत, जि. नगर) व जयश्री भगवान कांबळे (वय 21, रा. यश इन चौक, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ही टोळी सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना छोट्या-मोठ्या कंपनीत अंगमेहनतीची कामे देत. तसेच याविरोधात जाब विचारणारांना मारहाण करून हाकलून देत,अशी माहिती रांजणगाव एमआयडीसील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.