BOB Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये ‘या’ पदावर नोकरीची मोठी संधी; पात्रता ग्रॅज्युएट

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या (BOB Recruitment 2024) उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ बडोदामध्ये व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.

संस्था – बँक ऑफ बडोदा
भरले जाणारे पद – व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (BOB Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Assistant General Manager, Bank of Baroda, Regional office, Baroda City Region II, Ground Floor, Suraj Plaza 1, Sayajigunj, Baroda – 390005

आवश्यक शैक्षणीक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा; तसेच त्याच्याकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (BOB Recruitment 2024)
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षे
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 10,000/- रुपये ते 15,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – (BOB Recruitment 2024)
अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com