Board Exam Results 2024 : सावधान!! बोर्डाच्या निकालाबाबत अफवांवर ठेवू नका विश्वास…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व (Board Exam Results 2024) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षकांचा निकाल केव्हा जाहीर होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून निकालाबाबत सोशल मिडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये निकालावरून गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र,विद्यार्थ्यांनी व पालकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये; बोर्डाकडून निकालाबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल; असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले आहे.

“राज्य मंडळातर्फे इयत्ता 12वीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तर 10वीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे कोणीही निकालाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यावर बोर्डातर्फे ऑनलाईन निकालाची (Board Exam Results 2024) तारीख अधिकृपणे जाहीर केली जाईल;” असे गोसावी यांनी सांगितले आहे.

‘ही’ केवळ अफवाच (Board Exam Results 2024)
विद्यार्थी व पालकांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे; त्यामुळे समाज माध्यमावर प्रसिध्द होणाऱ्या निराधार बातम्यांवर अनेकजण विश्वास ठेवत आहेत. काही शाळांमधील शिक्षकांना याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा बोर्डातील दूरध्वनी दिवसभर वाजत होता. पण बारावीचा निकाल आज जाहीर झालाच नाही कारण ती केवळ अफवा होती. दोन्ही निकाल मे महिन्यातच जाहीर होणार आहेत. पण बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठडयात जाहीर होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com