BMC Recruitment 2023 : ग्रॅज्युएटसाठी मुंबई महापालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु; इथे पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका येथे लवकरच (BMC Recruitment 2023) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ, कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ ही पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 असणार आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

भरली जाणारी पदे – (BMC Recruitment 2023)

कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ (Junior Physiotherapist / Physiotherapy Specialist)

कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ (Junior Occupational Therapist / Occupational Therapist)

पद संख्या – 31 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ (Junior Physiotherapist / Physiotherapy Specialist) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (BMC Recruitment 2023)

  • कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ (Junior Occupational Therapist / Occupational Therapist) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

1. कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ (Junior Physiotherapist / Physiotherapy Specialist) –

35,400/- – 1,12,400/- रुपये दरमहा (BMC Recruitment 2023)

2. कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ (Junior Occupational Therapist / Occupational Therapist) – 35,400/- – 1,12,400/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता – (BMC Recruitment 2023)

प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, बांद्रा (प.),07 वा मजला, डॉ. आर. के. पाटकर मार्ग, मुंबई 400050.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com