BMC Recruitment 2023 : मुंबई महापालिकेत ज्युनिअर स्टेनोग्राफर पदांच्या 226 जागांच्या भरतीची घोषणा

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई महानगरपालिकेत नोकरी (BMC Recruitment 2023) करु इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी आणि मराठी) यापदाच्या पदभरतीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी विविध प्रवर्गातील तब्बल २२६ उमेदवारांची या पदभरतीमधून नियुक्ती केली जाणार आहे.
या भरतीअंतर्गत पालिकेत कनिष्ठ लघुलेखक पदावर उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. मौखिक चाचणी आणि ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
भरले जाणारे पद – कनिष्ठ लघुलेखक (Junior Stenographer) (इंग्रजी नि-मराठी)
पद संख्या – 226 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी मुंबई

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BMC Recruitment 2023)
1. उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम प्रमाणपत्र परीक्षा पहिल्या प्रयत्नांत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला, विज्ञान, वाणिज्य किंवा तत्सम शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयात्नांत किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. उमेदवार १०० गुणांची मराठी भाषा विषयाची इयत्ता दहावी किंवा मराठी विषय असलेली तस्यम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. तसेच, इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
० कनिष्ठ लघुलेखक(इंग्रजी) – इंग्रजी टायपिंग ४० WPM आणि इंग्रजी स्टेनोग्राफी ८० WPM आणि MS-CIT.
० कनिष्ठ लघुलेखक(मराठी) – मराठी टायपिंग ३० WPM आणि मराठी स्टेनोग्राफी ८० WPM आणि MS-CIT.
० उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट यांचे उत्तम ज्ञान असणे अत्यावश्यक आहे.

मिळणारे वेतन –  25,500/- ते  81,100/- रुपये दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
3. अर्ज करण्यापूर्वी (BMC Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com