BMC Recruitment 2022 : मुंबई महापालिका शाळेत शिक्षकांची बंपर भरती!! तासिका पद्धतीने 800 जागा भरणार; मिळणार आकर्षक मानधन

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या 800 जागा (BMC Recruitment 2022) तासिका पद्धतीने भरल्या जाणार आहेत. मुख्याध्यापकांच्या अधिकाराखाली पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीनंतर नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पालिका शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.

विद्यार्थ्यांची संख्या वाढली

मुंबई महापालिका शाळांतील गळतीचे प्रमाण कमी झाले असून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे 800 जागा कंत्राटी (तासिका) पद्धतीवर (BMC Recruitment 2022) भरण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या जागा भरण्याचे अधिकार शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले असून संबंधित शाळांच्या नोटीस बोर्डवर शिक्षकांच्या नियुक्त्यांबाबत आवाहन केले जात आहे.

शिक्षकांना मिळणार आकर्षक मानधन (BMC Recruitment 2022)

सोमवारपासून याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असून पात्र शिक्षकांना थेट मुलाखतीद्वारे तात्काळ नियुक्त केली जाणार आहे. तासिका पद्धतीवरील या नियुक्त्या असून प्रत्येक तासासाठी 150 रुपये मानधन दिले जाणार आहे. दिवसभरात सहा तास शिकवावे लागणार असून दररोज 900 रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे दरमहा 24 किंवा 25 दिवस काम केल्यास 22 ते 23 हजार रुपये शिक्षकांना मानधन मिळणार आहे. किमान सहा महिन्यांसाठी ही नियुक्ती असणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार मुदतवाढ दिली जाईल, असेही कुंभार यांनी सांगितले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com