करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (Big News) शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये अपयश आलेल्या विद्यार्थ्यांची बोर्डाकडून जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या दि. 27 मे पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज भरायचा आहे. तसेच अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य मंडळाने सांगितले आहे.
परीक्षे संदर्भात महत्वाच्या तारखा –
1. महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची तारीख 31 मे ते 15 जून 2024 अशी आहे.
2. उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख 18 जून आहे. (Big News)
3. दि. 27 मे 2024 पासून शुक्रवार दि. 7 जून 2024 या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.
4. 8 जून 2024 ते 12 जून 2024 या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा उपलब्ध (Big News)
इयत्ता 12 वी परीक्षेच्या निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत समुपदेशक विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातून नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील.
समुपदेशकांचे मोबाईल क्रमांक –
7387400970, 9011302997, 9011184242, 8421150528, 8828426722, 9881418236, 9359978315, 8263876896, 8369021944, 7387647902 या क्रमांकावर संपर्क साधून विद्यार्थी समुपदेशन घेवू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com