करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भरती (Big News) परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या JE, CHSL, CPO, आणि भरती परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. SSC ने यावर्षी विविध भरती परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनने 8 एप्रिल 2024 रोजी जारी केलेल्या नोटीसमधील परीक्षा वेळापत्रकानुसार कनिष्ठ अभियंता JE परीक्षा 2024 चा पहिला टप्पा अर्थात पेपर 1 (CBE) आता 5, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येणार आहे; यापूर्वी ही परीक्षा 4, 5 आणि 6 जूनला होणार होती.
अशा आहेत परीक्षेच्या सुधारीत तारखा
लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर SSC (SSC) परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. विविध निवड पोस्ट फेज 12, 2024 परीक्षेचा पहिला टप्पा पेपर 1 (CBE) आता 24, 25 आणि 26 जून रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी यापूर्वी 6, 7 आणि 8 मे या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. SSC ने 27, 28 आणि 29 जून रोजी दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र दल (CAPFs) सब-इन्स्पेक्टर परीक्षा 2024 चा पहिला टप्पा म्हणजेच पेपर 1 (CBE) आयोजित करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी ही परीक्षा 9, 10 आणि 13 मे रोजी होणार होती.
CBE परीक्षा पेपर 1 ची तारीख जाहीर (Big News)
दुसरीकडे, स्टाफ सिलेक्शन कमिशनने CBE परीक्षा 2024 च्या पहिल्या टप्प्यातील पेपर 1 ची तारीख देखील जाहीर केली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार, ही परीक्षा 1, 2, 3, 4, 5, 8, 9, 10, 11 आणि 12 जुलै 2024 रोजी घेतली जाईल. या अगोदर या परीक्षा आयोजित करण्याच्या निश्चित तारखा जाहीर केलेल्या नव्हत्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com