Big News : पोलीस आणि SRPF भरतीच्या तारखा पुढे ढकला : खा. नीलेश यांची मागणी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात दि. 19 जून पासून सर्वत्र (Big News) पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस चालक, जेल पोलीस आणि SRPF भरतीसाठी मैदानी चाचणी सुरू होत आहे. या विविध भरतीच्या तारखा या एकाच दिवशी किंवा सलग एका पाठोपाठ एक लागून आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत. अशातच पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना सलग एका पाठोपाठ ग्राउंड आल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ग्राउंड टेस्टसाठी जाणं शक्य होणार नाही. वर्षानुवर्ष मेहनत घेणाऱ्या उमेदवारांच्या भविष्याचा विचार करून सरकारने पोलीस भरती व SRPF भरतीच्या तारखा बदलाव्यात अशी मागणी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना दिले निवेदन (Big News)
दरवर्षी लाखोउमेदवार वर्षानुवर्षे भरतीची तयारी करत असतात. पण ऐन भरतीच्या वेळेसच सरकारकडून अशाप्रकारचा सावळा गोंधळ निर्माण होतो आणि विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागतो. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून पोलीस भरती व SRPF भरतीच्या तारखा बदलाव्यात, अशा मागणीचे निवेदन निलेश लंके यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना दिले आहे.

भरतीसाठी मैदानी चाचणी देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडे (Big News) त्यांची महत्त्वाची मूळ कागदपत्रे असतात. ही कागदपत्रे पावसात भिजली तर त्यांना भरतीसाठी अडचणी निर्माण होतील. भरतीसाठी आलेले विद्यार्थी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेले असतात. त्यांना जेवण, राहण्याची सोय नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. भरतीसाठी आलेले उमेदवार पाऊस नसेल तर कुठेही रात्रीचा निवारा शोधू शकतात. पण पाऊस असेल तर या उमेदवारांची मोठी गैरसोय होईल; याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा; असेही खा. लंके यांनी म्हटलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com