Big News : धक्कादायक!! 10 वी, 12वीत तब्बल 65 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी नापास; आकडेवारी काय सांगते…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या (Big News) अहवालामधून असं स्पष्ट झालं आहे की, मोठ्या संख्येने 10 वी आणि 12 वीचे विद्यार्थी परीक्षेत अपयशी ठरले आहेत. हा अहवाल सादर करताना राज्य मंडळापासून ते स्कूल बोर्डापर्यंत अनेक बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या निकालांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मध्यप्रदेश बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल सर्वात कमी लागल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये 65 लाखांहून अधिक विद्यार्थी इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत.

हाती आलेल्या अहवालानुसार,या विश्लेषणामध्ये (Big News) ज्या मंडळांचे इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल समाविष्ट करण्यात आले आहेत त्यामध्ये 59 स्कूल बोर्ड, 56 राज्य मंडळे आणि 3 राष्ट्रीय मंडळे यांच्याशी संलग्न शाळांचा समावेश आहे. याच अहवालात गेल्या वर्षी ६५ लाखांहून अधिक मुले बोर्डाच्या परीक्षेत अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

5.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही (Big News)
मीडिया रीपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या अहवालाच्या माहितीनुसार,या अहवालात दहावीचे सुमारे 33.5 लाख विद्यार्थी पुढील वर्गात पोहोचू शकले नाहीत,तर 5.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही तर 28 लाख विद्यार्थी नापास झाले. तसेच सुमारे 32.4 लाख विद्यार्थी 12 वीची परीक्षा पूर्ण करू शकले नाहीत. यासह 5.2 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही आणि 27.2 लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

आकडेवारी काय सांगते
इयत्ता 10 वीमध्ये सर्वाधिक मुले एमपी बोर्डातून नापास झाली आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर बिहार बोर्ड आणि तिसऱ्या क्रमांकावर यूपी बोर्ड आहे. बारावीत उत्तर प्रदेश बोर्डात (Big News) सर्वाधिक मुले नापास झाली आणि त्यानंतर मध्य प्रदेशच्या विद्यार्थ्यांचा नंबर लागतो. राष्ट्रीय बोर्डाच्या तुलनेत राज्य मंडळाचे अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रीय बोर्डाच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ६ टक्के होती, तर राज्य मंडळाचे १६ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com