करिअरनामा ऑनलाईन । कोरोना काळानंतर सर्वच (Freelancing Jobs) वयोगटातील नोकरदार वर्गाचा फ्रीलान्सिंग नोकऱ्या करण्याकडे कल वाढू लागला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोक आता आपले कुटुंब आणि कामाचा समतोल साधण्यासाठी फ्रीलान्सिंग जॉबला प्राधान्य देत आहेत. तुम्हीही असाच काहीतरी विचार करत असाल, तर तुमच्यासाठी फ्रीलान्सिंग जॉब हा एक चांगला पर्याय असू शकतो. या लेखात दिलेल्या कोणत्याही क्षेत्रात तुमचे कौशल्य असेल तर तुम्ही त्या क्षेत्रात फ्रीलान्स नोकरी करुन चांगली कमाई करु शकता.
1. ब्लॉगिंग
तुमचे लेखन कौशल्य चांगले असेल तर तुम्ही ब्लॉगिंगद्वारे उत्तम पैसे कमवू शकता. अनेक कंपन्या ब्लॉगर्सना फ्रीलान्स काम देतात. इतर कोणासाठी ब्लॉग लिहिण्याव्यतिरिक्त, आपण या क्षेत्रात आपली स्वतःची ब्लॉगिंग साईट देखील उघडू शकता आणि पैसे कमवू शकता. एकदा तुम्हाला Google कडून AdSense मंजूरी मिळाल्यावर, तुम्ही येथून सहजपणे लाखो रुपये कमवू शकता.
2. कंटेंट रायटिंग (Freelancing Jobs)
सध्या, प्रत्येक कंपनी जाहिरातबाजीसाठी कंटेंट रायटरच्या शोधात असते. यासोबतच अनेक न्यूज वेबसाइट्स आणि वृत्तपत्रेही लेख लिहिण्यासाठी फ्रीलान्सरची नियुक्ती करतात. जर तुम्हाला तुम्हाला तुमच्या मातृ भाषेसोबत हिंदी किंवा इंग्रजीमध्येही चांगले लिहिता येत असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी खूप चांगला आहे. यामध्ये तुम्हाला पॅकेजनुसार किंवा कंटेंटनुसार नोकर्या मिळू शकतात आणि त्यानुसार तुम्ही घरुन काम करु शकता.
3. व्हिडिओ बनवून करु शकता कमाई
अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांची पोहोच वाढवण्यासाठी व्हिडिओची मदत घेतात. जर तुमच्याकडे उत्तम संवाद कौशल्य असेल आणि तुम्ही कॅमेरा फ्रेंडली असाल तर (Freelancing Jobs) हे क्षेत्र तुम्हाला नवीन उंची प्राप्त करुन देईल. कोणत्याही कंपनीसाठी व्हिडिओ बनवून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. कोणत्याही एका क्षेत्रात तज्ज्ञ झाल्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करुन लाखो रुपये कमवू शकता.
याशिवाय तुम्ही डेटा एन्ट्री, वेब डेव्हलपमेंट, ट्रान्सलेटर, ग्राफिक डिझायनिंग, वेबसाईट क्रिएटर, व्हिडीओ एडिटर यांसारख्या क्षेत्रात फ्रीलान्स काम करूनही कमाई करू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com