Be Alert : Fake ऑफर लेटर कसं ओळखाल? गृहमंत्रालयाने दिल्या ‘या’ सूचना

करिअरनामा ऑनलाईन। तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ऑनलाईन आणि सोशल मीडियावर जॉब (Be Alert) शोधण्यासाठी आणि जॉब्सबद्दल माहिती देण्यासाठी अनेक वेबसाईट्स उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी काही वेबसाईट्स आपल्याकडून पैसे घेतात तर काही वेबसाईट्स फ्री असतात. मात्र अशा अनेक वेबसाईट्सवर अनेक फ्रॉड आणि डेटा चोरी करणारे लोकंही असतात. जे खोटी वेबसाईट तयार करून तुमची संपूर्ण खासगी माहिती चोरी करू शकतात. तसंच तुमच्या अकाउंटमधून पैसे चोरी करू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन जॉब शोधताना काय काळजी घेतली पाहिजे याबाबत सांगणार आहोत.

गृहमंत्रालयाने केले सतर्क –

केंद्रीय गृहमंत्रालयाने एक सूचना जारी केली आहे. या अंतर्गत मंत्रालयाने तरुणांना सतर्क करताना बनावट ऑनलाइन जॉब ऑफर ओळखण्याचे काही मार्ग दिले आहेत. गृह मंत्रालयाच्या या संकेतांद्वारे, युवक फसवणुकीला बळी पडणे आणि त्यांना पकडून खोट्या नोकरीच्या ऑफरला बळी पडणे टाळू शकतात. मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे.

अशा पध्दतीने ओळखा फेक ऑफर लेटर –

फसवणुकीच्या ऑफर लेटरमध्ये नियुक्ती पत्र अगदी सहजपणे जारी केले जाते.

मुलाखतकार एका छोट्या चॅटनंतर नोकरीची पुष्टी करतो.

बनावट जॉब ऑफर अनेकदा नियुक्ती पत्रात प्रोफाइल आणि कामाचा (Be Alert) तपशील नमूद करत नाहीत.

ज्या ईमेल आयडीवरून अपॉइंटमेंट लेटर पाठवले जाते ते अव्यावसायिक पद्धतीने लिहिलेले आहे.

ईमेल पाठवणारा वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती विचारतो.

नोकरीच्या ऑफरसाठीही पैशांची मागणी केली जाते.

असे झाल्यास गृह मंत्रालयाच्या सायबर गुन्हे शाखेला माहिती द्या.

केंद्रीय गृहमंत्रालयाने आवाहन केले आहे की, जर कोणाशी ऑनलाइन फसवणूक झाली असेल किंवा अशा ऑफर आल्या तर तत्काळ मंत्रालयाच्या सायबर क्राईम शाखेला कळवा. यासाठी तुम्ही www.cybercrime.gov.in या नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर लॉग इन करून तक्रार नोंदवू शकता.

स्वतःविषयी माहिती देऊ नका (Be Alert)

ऑनलाईन जॉब शोधताना तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर जर ईमेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स, बँक खाते क्रमांक, क्रेडिट-डेबिट कार्ड संबंधित माहिती यासारखी वैयक्तिक माहिती विचारली गेली असेल तर ती देऊ नका. लक्षात ठेवा नामांकित कंपन्या अशी माहिती विचारत नाहीत, कंपनी योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटला नक्की भेट द्या आणि तुम्ही बघितलेला जॉब खरंच आहे का याची खात्री करून घ्या.

वेब पेज सिक्युरिटी तपासणे आवश्यक

तुम्ही ओपन केलेल्या वेबसाईटचं Web Page सिक्युअर आहे ना? हे आधी तपासा. हे ओळखणे खूप सोप्पं आहे. जर वेब पेज सुरक्षित नसेल तर साइटला http ऐवजी https असं असेल. अशा (Be Alert) प्रकारे काळजी घेतल्यानं आपली वैयक्तिक माहिती चुकीच्या हातात जाणार नाही.

प्रायव्हसी पॉलिसीकडे लक्ष द्या

सुप्रसिद्ध नामांकित कंपन्या त्यांच्या यूजर्ससाठी प्रायव्हसी पॉलिसी ठेवतात. यात नाव, ईमेल पत्ता किंवा जास्तीत जास्त फोन नंबर आणि पत्ता विचारला जातो. बर्‍याच वेबसाईट्स सोशल सिक्युरिटी देखील देतात, प्रत्येक वेळी लॉग इन करताना त्यासाठी सिक्युरिटी कोड द्यावा लागतो अशा साइट विश्वसनीय असतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com