BAVMC Pune Recruitment 2023 : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! पुण्याच्या ‘या’ कॉलेजमध्ये होणार नवीन उमेदवारांची निवड 

करिअरनामा ऑनलाईन । भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (BAVMC Pune Recruitment 2023) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे अंतर्गत भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधीक्षक, वरिष्ठ रहिवासी, वरिष्ठ निवासी (शिक्षक), महिला वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे
भरले जाणारे पद –
1. प्राध्यापक – 08 पदे
2. सहयोगी प्राध्यापक – 12 पदे
3. सहायक प्राध्यापक – 17 पदे
4. वैद्यकीय अधीक्षक – 01 पद
5. वरिष्ठ रहिवासी – 22 पदे
6. वरिष्ठ निवासी (शिक्षक) – 07 पदे
7. महिला वैद्यकीय अधिकारी – 01 पद
8. कनिष्ठ निवासी – 15 पदे
पद संख्या – 83 पदे (BAVMC Pune Recruitment 2023)

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे.
भरतीचा तपशील – (BAVMC Pune Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.bavmcpune.edu.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com