Bahujan Kalyan Vibhag Bharti 2022 : रिटायर्डमेंट नंतरही करा जॉब!! बहुजन कल्याण विभागात नोकरीची संधी; कसा कराल अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग येथे लवकरच काही (Bahujan Kalyan Vibhag Bharti 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात काढण्यात आली आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या E-Mail आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 असणार आहे.

या पदासाठी भरती –

सहाय्यक कक्ष अधिकारी. (Assistant Room Officer)

एकूण जागा – 09

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Bahujan Kalyan Vibhag Bharti 2022)

  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे सेवानिवृत्त असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवार हे सहाय्यक कक्ष अधिकारी किंवा कक्ष अधिकारी म्हणून रिटायर्ड असणं आवश्यक आहे.
  4. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  5. उमेदवारांना संबंधित पदाचा तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  6. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

हे वाचा –

  1. ही पदभरती शासनातर्फे केवळ एक वर्षांच्या कालावधीसाठी होणार आहे.
  2. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांवर कोणत्याही प्रकारची केस किंवा चौकशी सुरु नसावी.
  3. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो (Bahujan Kalyan Vibhag Bharti 2022)

अर्ज पाठवण्याचा E – Mail ID – [email protected]

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 18 जून 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे CLICK करा.

अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com