B.Ed. College Audit : बी. एड. कॉलेजेसचे बिंग फुटणार; उच्च शिक्षण संचालनायाच्या सूचनेनुसार होणार ऑडिट

करिअरनामा ऑनलाईन । उच्च शिक्षण संचालनालयामार्फत (B.Ed. College Audit) राज्यभरातील सर्व शिक्षणशास्त्र महाविद्यालयांची (बीएड) तपासणी करण्याची सूचना विद्यापीठांना देण्यात आली आहे. या सूचनेनुसार विद्यापीठांना संलग्न बीएड महाविद्यालयांचे अॅकॅडमिक अँड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट करून त्याचा अहवाल उच्च शिक्षण संचालनालयाला सादर करावा लागणार आहे. या रिपोर्टमुळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमधील अनेक असुविधांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक शिक्षणशास्त्र महाविद्यालये सुविधांपासून वंचित असून, बहुतांश महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनही केलेले नाही. सातत्याने सूचना देऊनही नॅकबाबत ही महाविद्यालये उदासीन असून, आता खुद्द शिक्षण संचालनालयानेच त्यांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. याबाबत राज्यातील (B.Ed. College Audit) सर्व विद्यापीठांना शिक्षणशास्त्र महाविद्यालयांचे अॅकॅडमिक अँड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट करण्याची सूचना शिक्षण संचालनालयाने दिली आहे. ही तपासणी महाविद्यालयांच्या शैक्षणिक तसेच व्यवस्थापकीय गोष्टींशी निगडीत असल्यामुळे या तपासणीअंती अनेक शिक्षणशास्त्र महाविद्यालयांची पोलखोल होणार आहे.

‘या’ महाविद्यालयांचा समावेश (B.Ed. College Audit)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत या तपासणीसाठी शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना २० मार्चपर्यंत महाविद्यालयांबाबतची माहिती ऑनलाइन भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर विद्यापीठ एका कमिटीच्या माध्यमातून ही तपासणी करणार आहेत. नाशिक जिल्ह्यात (B.Ed. College Audit) जवळपास २० शिक्षणशास्त्र महाविद्यालये असून, त्यांना या तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. नियमाप्रमाणे भरती किंवा सुविधा नसल्यास संबंधित महाविद्यालयाची संलग्नता काढून घेण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे. महाविद्यालय विकास अनुदान न देण्याचा निर्णयही विद्यापीठाच्या हातात आहे.

शारीरिक शिक्षणाच्या कॉलेजांची होणार तपासणी

विद्यापीठाने संलग्नता नाकारल्यास त्याचा परिणाम पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेवर होणार असून, संलग्नतेआभावी महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया राबविता येणार (B.Ed. College Audit) नाही. परिणामी, या तपासणीनंतर त्रुटी आढळल्यास अनेक महाविद्यालयांना तातडीने त्याची पूर्तता करावी लागणार आहे. शिक्षणशास्त्र महाविद्यालयांप्रमाणे शारीरिक शिक्षणाच्या महाविद्यालयांचीही विद्यापीठामार्फत तपासणी केली जाणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com