Artificial Intelligence Jobs : AI मुळे टेक्नॉलॉजी क्षेत्रात नोकऱ्या वाढणार; शिक्षण क्षेत्रात होणार बदल; पहा मायक्रोसॉफ्टचे सीईओ काय म्हणाले

करिअरनामा ऑनलाईन । कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence Jobs) म्हणजेच Artificial Intelligence च्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रभावामुळे अनेक क्षेत्रांची चिंता वाढली आहे. काही लोक याला आगामी काळात रोजगारासाठी मोठा धोका मानत आहेत. त्याचवेळी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला याबाबत सकारात्मक आहेत. ते म्हणाले की; AI चा विकास वेगाने होत आहे आणि तो योग्य दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे आगामी काळात शिक्षणासह अनेक क्षेत्रात चांगले बदल पाहायला मिळतील.
लोक कृत्रिम बुद्धिमत्ता विकास प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहेत, असेही सत्या नडेला म्हणाले. एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की; जेव्हा जेव्हा नवीन तंत्रज्ञान येते तेव्हा ते काही (Artificial Intelligence Jobs) क्षेत्रांसाठी चांगले असते तर काहींसाठी ही धोक्याची सूचना असते.
नडेला पुढे म्हणाले; AIपासून शिक्षण क्षेत्रातही अनेक चांगले बदल येत्या काळात पाहायला मिळतील. ते म्हणाले की एआय ट्यूटर माहितीचे खंडण (Artificial Intelligence Jobs) करू शकतात आणि शिकण्याची भीती दूर करू शकतात.

अलीकडेच Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर (Artificial Intelligence Jobs) पिचाई यांनी देखील सूचित केले की एआय काही नोकर्‍या काढून घेऊ शकते परंतु ते नवीन नोकऱ्यांच्या निर्मितीबद्दल आशावादी आहेत. त्याचप्रमाणे, मायक्रोसॉफ्ट-समर्थित ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी देखील सांगितले की एआय काही नोकर्‍या काढून टाकेल, परंतु आगामी काळात अनेक नवीन नोकर्‍या देखील निर्माण करेल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com