Army Success Story : रोजचं 10 KM धावणं, मंदिराच्या 880 पायऱ्या चढणं; कशी झाली लेफ्टनंट? पाहूया इशू यादवचा प्रेरणादायी प्रवास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अवघड नसते. (Army Success Story) अशी शिकवण देणारी गोष्ट राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातून समोर आली आहे. झुंझुनू जिल्ह्यातील नवाटा गावातील 18 वर्षीय इशू यादवची लष्करी नर्सिंग सेवेत लेफ्टनंट पदावर निवड झाली आहे. हे पद मिळवणारी इशू ही तिच्या गावातील पहिली मुलगी आहे. आर्मीच्या परीक्षेत तिने 17 वा क्रमांक पटकावला आहे. लवकरच ती लखनऊमध्ये प्रशिक्षण सुरू करणार आहे. मात्र या सर्व यशामागची कहाणी सुन्न करणारी होती आणि प्रेरणादायीसुद्धा. पाहूया इशू लेफ्टनंट पदापर्यंत कशी पोहचली…

शहिदांच्या कथा ऐकायची…

लहानपणापासून इशूला शहीदांच्या कथा ऐकण्याची खूप आवड होती. गावातील हुतात्म्यांचे पुतळे पाहून तिच्या मनात सैन्यात भरती होण्याची इच्छा निर्माण झाली आणि तिने तीची इच्छा कुटुंबासमोर व्यक्त केली. इशुच्या कुटुंबीयांनी देखील तिच्या इच्छेला प्रोत्साहन दिले.

NEET Exam मध्ये नापास…तरीही सोडली नाही जिद्द (Army Success Story)

इशू यादवसाठी लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. इशू पूर्वी NEET ची तयारी करत होती. या परीक्षेत ती नापास झाली. या अपयशाने हार न मानता तिनं भारतीय लष्कराकडे लक्ष वळवले आणि लष्कराची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली. मात्र अडचणींनी तिची साथ इथेही सोडली नाही. शारीरिक तपासणीत तिचे वजन 27 किलो जास्त होते. तिला ओव्हर वेट पॉईंटचा संदर्भ देण्यात आला. मात्र तिने हार मानली नाही. तिने शारीरिक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

अशाप्रकारे वजन घटवलं

इशूचे वजन 79 किलो होते आणि तिला पात्रता फेरीसाठी 52 किलो वजन हवे होते. त्यासाठी तीला सुमारे 27 किलो वजन कमी करावे लागणार होते. एवढ्या कमी वेळात वजन कसे कमी होईल, अशी चिंता तिच्यासोबत घरच्यांनाही लागली होती. पण हार न मानता, इशूने आपले प्रयत्न चालू ठेवले. तिने आपल्या आहाराची काळजी घेतली. (Army Success Story) ती दुपारच्या जेवणात १ चपाती आणि ताज्या फळांचा ज्यूस घ्यायची. गावातील सिद्धबाबा मंदिराच्या पायऱ्या चढण्यासआणि उतरण्यास तिने सुरुवात केली. या मंदिरास 880 पायऱ्या आहेत. तेवढ्या पायऱ्या ती दररोज चढायची आणि उतरायची. याशिवाय ती रोज 10 किलोमीटर धावत असे. हा व्यायाम तिच्यासाठी नित्याचा होता. यादरम्यान, इशूला आणखी 40 दिवस मिळाले. आपल्या मेहनतीच्या जोरावर इशूने अवघ्या 80 दिवसांत 27 किलो वजन कमी केले.

नातीने डॉक्टर व्हावे अशी आजोबांची इच्छा

राजस्थानच्या शेखावती आर्मीमध्ये भरती होण्यासाठी तरुणांमध्ये नेहमीच प्रचंड उत्साह असतो. इशूच्या गावातील अनेक लोक सैन्यात आहेत. आपल्या नातवंडांनी डॉक्टर व्हावे अशी इशुच्या आजोबांची इच्छा होती. याच कारणामुळे इशूने बारावीत जीवशास्त्राचा अभ्यास केला. आणि डॉक्टर होण्याच्या दृष्टीने तिचा प्रवास सुरु झाला. जिद्दीच्या जोरावर आज ती लष्करात लेफ्टनंट पदापर्यंत पोहचली आहे. लष्करात अधिकारी पदापर्यंत पोहचणारी इशू तिच्या गावातील पहिली तरुणी आहे. तिच्या यशामुळे गावातील प्रत्येकजण आनंदी आहे.

इशूमुळे संपूर्ण गावात आनंदी आनंद

शेखावतीच्या प्रत्येक गावातील बहुतांश तरुण सैन्यात आहेत. इशू सांगते, ‘मी अनेकदा शहीदांच्या कथा ऐकायचे. या कथा ऐकल्यामुळे आणि शौर्यगाथा वाचल्यामुळे मला लष्करात जाण्याची प्रेरणा मिळाली. येशूची सैन्यात निवड झाल्यानंतर गावकरीही आनंदात आहेत. इशुच्या यशाचा जल्लोष करण्यासाठी गावात लोकांनी विजयी मिरवणूक काढली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com