करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यदलातील अनेक वीर जवानांनी भारतमातेच्या (Army Success Story) रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. भारतीय सेनेच्या बिहार रेजिमेंटच्या 7व्या बटालियनचे मेजर प्रसाद महाडिक हे सुद्धा कर्तव्य बजावताना शहीद झाले होते. यानंतर त्यांच्या पत्नी गौरी महाडिक यांनी आपले पती शहीद झाल्यानंतर भारतीय सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला होता.
सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून दाखल
वीरपत्नी गौरी महाडिक यांनी सैन्यात भरती होऊन शहीद पतीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा मानस व्यक्त केला होता. यानंतर त्या 2020 मध्ये भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून दाखल झाल्या. आता (Army Success Story) त्यांनी पायलट होण्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण केले असून त्या भारतीय सैन्यदलात पायलट पदावर विराजमान झाल्या आहेत.
विमान उड्डाणाचे घेतले धडे
मागील वर्षभरापासून गौरी महाडिक यांनी कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये (कॅट्स) आधुनिक रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीम प्रणाली अंतर्गत विमान उड्डाणाचे धडे घेतले. सध्या त्या कॅप्टन पदावर असून त्यांना नुकतंच समारंभपूर्वक विंग्स प्रदान करून गौरविण्यात आले.
भारत-चीन सीमेवरील ‘आसाम हिल’ येथे टॅन्क तपासणी करताना स्फोट झाला होता. या स्फोटात मेजर प्रसाद महाडिक यांना वीरमरण आले होते. शहीद मेजर प्रसाद महाडिक यांनी ज्या ठिकाणाहून प्रशिक्षण घेतले होते त्याच ठिकाणाहून गौरी यांनी चेन्नईच्या अकादमीत प्रशिक्षण घेतले.
‘आरपीएएएस विंग’ प्रदान
कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये त्यांनी बेसिक रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीमचे यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना दीक्षांत सोहळ्यात ‘आरपीएएएस विंग’ प्रदान (Army Success Story) करून गौरविण्यात आले. ड्रोन तसेच मानवविरहित लहान एअरक्राफ्टद्वारे सीमेवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. कॅट्समधून प्रथमच मागील वर्षभरापासून या ‘आरपीएएस’ प्रणालीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.
यावर्षी हा अभ्यासक्रम 18 अधिकाऱ्यांनी पूर्ण केला. यामध्ये कॅफ्टन गौरी महाडिक यांच्यासह अन्य दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मार्च 2020 साली त्या (Army Success Story) लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यात दाखल झाल्या. आता त्यांनी पायलट होण्यासाठीचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com