करिअरनामा ऑनलाईन । डॉ. दिनीशा यांनी बलपणीच भारतीय (Army Success Story) सैन्यदलात भरती होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्या लहान असताना टी. व्ही. वर ‘एक उडान’ नावाची एक हिंदी सिरिअल यायची. या सिरिअलमधील कथानकाने दिनीशा यांच्या बाल मनाला भुरळ घातली. ही सिरिअल पाहून त्यांच्या मनात सैन्यदलात भरती होण्याची इच्छा निर्माण झाली. इथून पुढचा त्यांचा प्रवास रोमांचकारी होता. जाणून घेण्यासाठी पुढे वाचा….
आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. असं कोणतच क्षेत्र नाही जिथे महिला प्रगती करत नाहीत. महिलावर्गाने आपल्यातील जिद्दीने समाजासाठी एक आदर्श वास्तूपाठ घालून दिला आहे. आज अशाच एका महिलेची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्या भारतीय सैन्यदलात कॅप्टन बनल्या आहेत.
भारतीय सैन्यदलात महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या बॅचमध्ये झाली निवड
कॅप्टन दिनीशा भारद्वाज (Captain Dinisha Bharadwaj) यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्याकाळात महिलांसाठी सैन्यदलाची नोकरी मिळवणं खूप आव्हानात्मक होतं. अशा काळात त्यांची (Army Success Story) भारतीय सैन्यदलात महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या बॅचमध्ये निवड झाली होती.
टी. व्ही. सिरिअल पाहून प्रेरणा मिळाली
दिनीशा लहान असताना त्यावेळी टी. व्ही. वर ‘एक उडान’ नावाची एक हिंदी सिरिअल लागायची. त्या ही सिरिअल दररोज न चुकता पहायच्या. ही सिरिअल पाहत असताना त्यांना वेगळीच ऊर्जा मिळाली. या सिरिअलमुळे त्यांनी सैन्यदलातच जाण्याचा निर्णय घेतला. मात्र हा प्रवास त्यांच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. दिनीशा यांच्यासमोर कुटुंबातून अनेक आव्हाने उभी होती.
कुटुंबाला हातभार लागावा म्हणून ट्यूशन घेतली
दिनीशा सांगतात; “पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करू लागले. पहिल्या वर्षात शिकत असताना भारतीय सैन्यदलात महिला अधिकारी पदासाठी पहिल्यांदाच भरती निघाली होती. त्यावेळी अर्ज निघाले होते पण त्याकडे मी विशेष लक्ष दिले नाही. मी शिक्षण घेत असताना आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून मी ट्यूशन घ्यायचे. तसेच विविध शिक्षण संस्थांमध्येही सहयो म्हणून काम करायचे.”
उपलब्ध होती केवळ 1 जागा (Army Success Story)
त्या पुढे सांगतात; ” सैन्य दलात भरतीसाठी अर्ज करताना फॉर्म काढून भरण्यासाठी अजिबात वेळ नव्हता. यासाठी मी भारतीय सैन्यदलाचा नोंदणी फॉर्म आपल्या हाताने A4 साइज पेपर वर तयार केला होता. फॉर्म भरताना मला समजलं की माझ्या विषयाची इथे फक्त एकच जागा होती, यासाठी संपूर्ण भारतातून निवड होणार होती. ही आणखी एक समस्या समोर उभी राहिली जी माझ्यासाठी निश्चितच आव्हानात्मक होती.”
अनेकांनी सांगितलं अर्ज भरू नको
एक महिला म्हणून सैन्यदलात भरती होणे, हे खूप आव्हानात्मक काम आहे; असे मला अनेकांनी सांगितले. तर एकच भरती आहे, पहिलीच नोकरी आहे, निवड झाली नाही तर निराश होशील, त्यामुळे अर्ज करू नको, असाही अनेकांनी सल्ला दिला. मात्र, ‘ही नोकरी माझ्यासाठीच आहे,’ असे दिनीशा यांचे मन संगत होते आणि शेवटी तसेच झाले.
बालपणी पाहिलेले स्वप्न झाले साकार
कठोर मेहनत घेतल्यानंतर दिनीशा यांची सैन्य दलात निवड झाली आणि लहानपणी त्यांनी पाहिलेले स्वप्न अखेर पूर्ण झाले. दिनीशा म्हणतात की, “सैन्यदलात तुम्हाला जेव्हा ट्रेनिंग (Army Success Story) दिले जाते तेव्हा तुम्ही एक जनरल ऑफिसरची ट्रेनिंग घेता. सैन्यदलातील एका पुरुष अधिकाऱ्याप्रमाणेच महिला अधिकाऱ्याला ट्रेनिंग देऊन तयार केले जाते. त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होते. सैन्यात वेगवेगळ्या ठिकाणांनुसार नोकरीचे कार्यक्षेत्र ठरवले जाते.” दिनीशा यांनी आर्मी एज्युकेशनल सेक्टरमध्ये काम केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com