Army Success Story : सातारच्या अजिंक्यने जिल्हयाचं नाव उंचावलं; आर्मीमध्ये बनला लेफ्टनंट 

Army Success Story of Ajinkya Kamble
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सैन्य दलात दाखल होऊन देशसेवा (Army Success Story) करणं ही सातारा जिल्ह्याची परंपरा… याच सातारा जिल्ह्यातील वहागाव (ता. जावळी) येथील तरुण अजिंक्य कांबळे अगदी कमी वयात सैन्य दलात अधिकारी झाला आहे. अजिंक्यने नुकतंच एनडीएचे तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तो आता सैन्य दलात लेफ्टनंट पद भूषवणार आहे. त्याच्या या कामगिरीने सातारा जिल्हयाचं नाव उज्ज्वल झालं आहे. सातारा जिल्ह्यातील हजारो युवक सैन्य दलात सामील होवून सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत. हीच परंपरा अजिंक्यनेही कायम ठेवली आहे.

लहानपणापासून होतं ध्येय (Army Success Story)
अजिंक्य हा विश्वास कांबळे यांचा मुलगा. त्यांचं कुटुंब मांजरी (पुणे) येथे वास्तव्यास आहे. अजिंक्यने लहानपणापासूनच सैन्यात अधिकारी होऊन देशसेवा करण्याचं ध्येय उराशी बाळगलं होतं. अजिंक्यच्या या स्वप्नाला त्याचे वडील विश्वास कांबळे आणि आई रेखा कांबळे यांनी पाठबळ दिले. आपला मुलगा सैन्य दलात मोठ्या पदावर अधिकारी व्हावा; अशी त्यांची इच्छा होती. ही इच्छा अजिंक्यने खडतर परिश्रम घेत पूर्ण केली आहे.

10 वीत 94 टक्के
पुणे येथील सरदार दस्तूर हरमोसदियार हायस्कूलचा अजिंक्य हा विद्यार्थी. त्याने 10वीत 94 टक्के गुण प्राप्त केल्यानंतर आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एनडीएमध्ये प्रवेश घेतला. त्याने छत्रपती संभाजीनगर येथील सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटमधून एनडीए ट्रेनिंगचे प्राथमिक प्रशिक्षण (Army Success Story) देणारे दोन वर्षांचे प्रशिक्षण शालेय शिक्षणासह पूर्ण केले. त्यानंतर सर्व सोपस्कार पार करून त्याने मोठ्या जिद्दीने पुणे खडकवासला येथील एनडीए अकादमीमध्ये प्रवेश मिळवला. अकादमीच्या 144 व्या तुकडीतून अजिंक्यने तीन वर्षांचे खडतर व आव्हानात्मक प्रशिक्षण पूर्ण केले.

देशाच्या विकासासाठी घर अन् जमिनीचा त्याग
अजिंक्यचे वडील विश्वास हे पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. त्यांचे मूळ गाव दुर्गम जावळी तालुक्यातील वहागाव हे आहे. त्यांचे सर्व शिक्षण याच परिसरात झाले आहे. विश्वास (Army Success Story) कांबळे हे स्वतः कुडाळी प्रकल्पातील महू धरणात पूर्ण बाधित आहेत. एकीकडे त्यांनी देशाच्या विकासासाठी घर, जमिनीचा त्याग केला आहे, तर दुसरीकडे आपल्या मुलाला देशसेवेसाठी संस्कार देऊन मोठा अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.
अजिंक्यच्या या निवडीमुळे जिल्ह्यासह देशात जावळी तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे. अजिंक्यच्या यशामुळे भारावलेल्या वहागाव ग्रामस्थांनी त्याचा जल्लोषात (Army Success Story) सत्कार केला. फटाक्यांची आतिषबाजी करत फुलांची उधळण करून त्याचे स्वागत करण्यात आले. या यशामुळे अजिंक्यचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com