Anganwadi Bharti 2023 : महिलांसाठी खुषखबर!! ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदाच्या 154 जागांसाठी भरती; पात्रता फक्त 12 वी

करिअरनामा ऑनलाईन । बाल विकास प्रकल्प अधिकारी (Anganwadi Bharti 2023) प्रकल्प, अमरावती अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 154 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक महिला उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 आणि 04 जुलै 2023 आहे.

संस्था – बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प, अमरावती
भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 154 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 आणि 04 जुलै 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12 वी पास
वय मर्यादा – (Anganwadi Bharti 2023)
1. 18 ते 35 वर्षे
2. विधवा उमेदवारांसाठी वय मर्यादा – 40 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती
अर्ज पाठवण्याचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी. प्रकल्प अमरावती शहर (उत्तर) दत्त पॅलेस, गांधी चौक अमरावती
मिळणारे वेतन – रुपये 5,500/- दरमहा
असा करा अर्ज –
1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. अर्जासोबत आवश्यक (Anganwadi Bharti 2023) कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

स्थानिक रहिवासी असल्याबाबत खालील पुरावे जोडणे आवश्यक आहे –
1. आधार कार्ड
2. मतदान कार्ड
3. घर टॅक्स पावती
4. चालु इलेक्ट्रीक बील (Anganwadi Bharti 2023)
5. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
6. शैक्षणिक पात्रतेकरीता गुणपत्रिका
7. शाळा सोडल्याचा दाखला
8. विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
9. जात प्रमाणपत्र
10. लहान कुटूंबाबाबत प्रतिज्ञापत्र
11. अनुभव असल्यास प्रमाणपत्र

काही महत्वाच्या लिंक्स – (Anganwadi Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

1. PDF जाहिरात I (70 पदे)
2. PDF जाहिरात II (49 पदे)
3. PDF जाहिरात III (36 पदे)
अधिकृत वेबसाईट – amravati.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com