Ajit Pawar : राजकारणात धक्क्यावर धक्के देणारे अजित पवार नेमके कितवी शिकले? एकदा पहाच

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ (Ajit Pawar) झाली असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार हे तात्काळ निर्णय घेणारे, स्पष्टवक्तेपणा असणारे नेते आहेत. ग्रामीण भागाची चांगली जाण असलेला तसेच तळागाळापर्यंत पोहोचलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. देवळाली (अहमदनगर) येथे प्राथमिक शिक्षण घेतल्या नंतर (Ajit Pawar) त्यांनी मुंबईत पदवीचे शिक्षण पूर्ण केले. भल्या भल्या राजकारण्यांची शाळा घेणारे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार नेमके कितवी शिकले? हे आपण पाहणार आहोत.
अजित पवार यांचे पूर्ण नाव अजित अनंतराव पवार असं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे 22 जुलै 1959 रोजी त्यांचा जन्म झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

अजित पवार यांचा शैक्षणिक प्रवास (Ajit Pawar)
1. अजित पवार यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाले. (Ajit Pawar)
2. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी अजित पवार यांना मुंबईत यावे लागले.
3. मुंबईत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
4. मुंबईत शिक्षण पूर्ण करून अजित पवार बारामतीला गेले.

अशी झाली सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात
अजित पवार यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांना शिक्षण सोडुन पुन्हा बारामतीला जावे लागले. येथे आल्यावर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी (Ajit Pawar) आपल्या खांद्यावर घेतली. बारामती येथे येऊन त्यांनी सहकारी संस्थांमधून सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.
1882 मध्ये ते सर्वप्रथम सहकारी साखर कारखान्याच्या मंडळावर विजयी झाले. याचवेळी त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला.
2010 ते 2014 या काळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणुन देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार संभाळला. त्यांनंतर ते विरोधी पक्षनेते झाले आणि आता आज पुन्हा त्यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com