Ajit Pawar : राज्यात होणार 1,50,000 नोकरभरती; अजितदादांनी दिली माहिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्यभर कंत्राटी भरतीचा मुद्दा (Ajit Pawar) चांगलाच गाजत आहे. या भरतीला राज्यातील तरुणांनी देखील तीव्र विरोध केला आहे. कंत्राटी भरतीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनाही चांगलच घेरलं. अखेर कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्यात आला आहे. ‘कंत्राटी भरतीचा निर्णय आणि धोरण आमचं नव्हतं. ते मागच्या सरकारचं होतं,’ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

कंत्राटी भरतीवरुन राज्य सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पण (Ajit Pawar) कंत्राटी भरतीचं पाप आमचं नव्हतं ते पाप तर काँग्रेस सरकारचं होतं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या या निर्णयानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मुद्द्यावर आज भाष्य केलं. तसेच विरोधकांनी केवळ अपप्रचार केल्याचा दावाही त्यांनी केला.

राज्यात दीड लाख नोकर भरती होणार (Ajit Pawar)
अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले; “कंत्राटी भरतीवर विरोधकांकडून अपप्रचार करण्यात येत असून तुमच्या नोकऱ्या काढून घेतल्या जातील असं सांगितलं गेलं. मात्र वस्तुस्थिती वेगळी होती. कॅबिनेटमध्ये हा विषय आला होता. तेव्हा मी पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती मांडतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानुसार त्यांनी वस्तुस्थिती मांडली आहे. आपण दीड लाख नोकर भरती करत आहोत, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ‘आता कोणी माफी मागायची आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे,’ असा टोलाही अजितदादांनी विरोधकांना लगावला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com