करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारने जाहीर केलेल्या (Agniveer Rally 2023) अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर भरती प्रक्रिया नागपुरात राबविण्यात येत आहे. येत्या १० जूनपासून ही भरती प्रक्रिया मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात होईल. अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. निवड झालेल्या अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन आणि सोयी-सुविधाही दिल्या जाणार आहेत. चार वर्षांनंतर या अग्निवीरांना सेवेतून निवृत्त केले जाईल; मात्र यापैकी 25 टक्के तरुणांना पुन्हा सेवेत घेतले जाणार आहे. त्यासाठी आणखी सहा महिन्यांचे स्वतंत्र प्रशिक्षण देण्याची तरतूद योजनेमध्ये आहे.
या अंतर्गत आता भरती प्रक्रियेसाठीची आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्या अंतर्गत 10 ते 17 जूनदरम्यान ही भरती प्रक्रिया मानकापूर येथे होईल. नागपूर येथे होणाऱ्या भरती प्रक्रियेत नागपूर, वर्धा, वाशीम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांतील युवकांना सहभागी होता येणार आहे. या (Agniveer Rally 2023) प्रक्रियेत बुलडाणा येथील उमेदवारांना सहभागी होता येणार नाही. भरती प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार, या प्रक्रियेत अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन, अग्निवीर क्लर्क, स्टोअरकीपर या पदांची पूर्तता होणार आहे. यासाठी 8वी ते 10वी उत्तीर्ण अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
नागपूर विभाग भरतीचे जिल्हानिहाय वेळापत्रक – (Agniveer Rally 2023)
10 जून : भंडारा, गडचिरोली
11 जून : वाशीम, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला (मूर्तीजापूर तालुका)
12 जून : अकोला (मूर्तीजापूर वगळून सर्व तालुके), नागपूर
13 जून : अमरावती, गोंदिया, वर्धा
14 जून : सर्व जिल्हे
15, 16, 17 जून : वैद्यकीय चाचणी
अग्निवीर सैन्यभरती संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्या अध्यक्षतेखाली सैन्यभरती संदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी (Agniveer Rally 2023) नागपुरच्या सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल आर. जगथ नारायण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बुलढाणा वगळता विदर्भातील दहा जिल्हातील युवकांना या सैन्य भरती मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com