Agnipath Yojana : ट्रेनिंग मध्येच सोडून पळताहेत अग्निवीर; काय आहे कारण? बेशिस्त अग्निवीरांवर होणार कारवाई

Agnipath Yojana (9)
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्कराच्या अग्निपथ योजनेअंतर्गत (Agnipath Yojana) लवकरच अग्निवीर वेगवेगळ्या युनिट्समध्ये सामील होणार आहेत. अग्निपथ योजनेअंतर्गत पहिल्या बॅचचे प्रशिक्षण संपले असून दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. पुढील महिन्यात पहिली तुकडी भारतीय लष्करात दाखल होणार आहे. मात्र, प्रशिक्षणादरम्यानच अनेक तरुण मधूनच प्रशिक्षण सोडून गेले आहेत. विविध कारणं देऊन ट्रेनिंग मधेच सोडणाऱ्या तरुणांवर कारवाई केली जाऊ शकते. तरुणांच्या प्रशिक्षणासाठी खर्च झालेली रक्कमही त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे.

पहिल्या बॅचच्या 50 हून अधिक जणांनी सोडली ट्रेनिंग
लष्कराचे ट्रेनिंग घेत असताना अग्निवीरांना मधूनच बाहेर पडायचं असल्यास काही नियम नाहीत, पण सध्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आता नवे नियम बनवण्याच्या तयारीत आहे. ‘नवभारत टाईम्स’च्या एका रिपोर्टनुसार, मधूनच ट्रेनिंग सोडून जाणाऱ्या तरुणांना दंड आकारण्यात (Agnipath Yojana) येणार आहे. रिपोर्टमध्ये एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, पहिल्या बॅचमधून 50 पेक्षा अधिक तरुणांनी ट्रेनिंग मधूनच सोडली आहे, तर दुसऱ्या बॅचमध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता मधूनच ट्रेनिंग सोडून जाणाऱ्यांकडून दंड आकारण्याचा लष्कराचा विचार आहे.  जे भारतीय लष्करात भरती होण्यासाठी खरोखरच इच्छुक आहेत, अशाच तरुणांवर भविष्यात लक्ष दिले जाणार आहे.

काय आहेत ट्रेनिंग सोडण्याची कारणे? (Agnipath Yojana)
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मधूनच ट्रेनिंग सोडणाऱ्या तरुणांकडून विविध कारणं देण्यात येतात. काही जण 30 दिवस किंवा त्याहून अधिक मेडिकल लिव्ह  घेवून बाहेर पडले तर काहींनी दुसरीकडे चांगली संधी मिळाल्याचं सांगून ट्रेनिंग मध्येच सोडली आहे. . सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे सैन्यात असा नियम आहे की, जर कोणी 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस ट्रेनिंगला गैरहजर राहिला तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो.
1 जानेवारीला पहिल्या बॅचमध्ये 19 हजारांहून अधिक अग्निवीरांना सामील करुन घेण्यात आलं होतं ज्यांची देशभरातील 40 वेगवेगळ्या सेंटर्सवर ट्रेनिंग झाली होती. सहा महिन्याच्या (Agnipath Yojana) ट्रेनिंगमध्ये अग्निवीरांसाठी बेसिक आणि अॅडव्हांस्ड मिलिट्री प्रोग्राम्स करुन घेतले जातात. सहा महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर अग्निवीरांना विविध युनिट्समध्ये तैनात केलं जाणार आहे आणि 4 वर्षांनंतर यातील 25 सैनिकांना नोकरीत कायम केलं जाणार आहे. भारतीय लष्कर 50 युवकांना नोकरीत कायम करु इच्छिते, त्यासाठी भारतीय लष्कराने केंद्रासमोर प्रस्ताव देखील मांडला आहे.
धिक माहितीसाठी पहा – https://careernama.com