सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा द्वितीय सत्राच्या परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय; परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत मोठी घोषणा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं 2020-21 या शैक्षणिक वर्षातील सत्राच्या परीक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे. ही परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सोबतच, मे महिन्याच्या अखेरपर्यंत वेळापत्रकाची घोषणा करण्यात येणार आहे. सध्या 2020-21 मधील प्रथम सत्राच्या परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून घेण्यात येत आहेत. या परीक्षा 15 मे पर्यंत संपणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाकडून जून महिन्यात दुसऱ्या सत्राची परीक्षा घेण्याची शक्यता आहे.

पुणे, अहमदनगर ,नाशिक या तीन जिल्ह्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं कार्यक्षेत्र आहे. या जिल्ह्यात विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयं आहेत. जिल्ह्यांमधील विद्यार्थी विद्यापीठांच्या परीक्षेला बसणार असल्याने मोठी तयारी करण्याची गरज आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील कुलगुरुंच्या सोबत ऑनलाईन बैठकीमध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळं राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येतील, असा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. त्याप्रमाणं महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येत आहेत.

उदय सामंत माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, ‘सर्व कुलगुरू सोबत परिक्षासंदर्भात बैठक झाली. तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या.आता ऊर्वरीत सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, अकृषी विद्यांपीठात ऑफलाईन परीक्षा होणार नाहीत. एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. टीवायचीही परिक्षा ऑनलाईन असेल’. यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने परीक्षा न होता केवळ ऑनलाईन पद्धतीने या परीक्षा घेण्यात येतील.