आजपासून राज्यातील 5 वी ते 8 वी च्या शाळा सुरु; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी शेयर केला खास व्हिडिओ

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा आॅनलाईन | कोरोना महामारिमुळे बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने आता सुुर होत आहेत. आजपासून राज्यातील 5 वी ते 8 वी च्या शाळा सुरु होत आहेत. यापार्श्वभुमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक खास व्हिडिओ शेयर करत विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचं आवाहन केलंय.

https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1354281409494577154

बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा नव्या उत्साहाने शाळा सुरू होत असताना विद्यार्थ्यांचा आनंद, शाळांची व शिक्षकांची तयारी, शिक्षकांची उत्सुकता अशा विविध भावना दर्शविणारी चित्रफीत शिक्षण विभागाने बनविली आहे. हा व्हिडिओ वर्षा गायकवाड यांनी ट्विट केला आहे.

दरम्यान, राज्यात यापूर्वी 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यात आले होते. यानंतर आता 5 वी ते 8 वी च्या शाळाही सुरु करण्यात आल्या आहेत. शाळा प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेऊनच वर्ग सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.