Indian Army Agniveer Recruitment 2025 : अग्निवीर भरतीच्या अर्जप्रक्रियेत मोठे बदल; तरुणांवर काय परिणाम होणार?

Indian Army Agniveer Recruitment
Indian Army Agniveer Recruitment
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन। (Indian Army Agniveer Recruitment 2025) जे उमेदवार भारतीय सेना अग्निवीर भरतीसाठीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी अनेक तरुण खूप मेहनत घेत असतात त्याचबरोबर भरतीसाठी दिलेल्या नियमानुसार देखील त्यांना सर्व तयारी करावी लागते. तसेच 12 मार्च 2025 पासून भारतीय सेना अग्निवीर भरतीसाठीचे अर्ज सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 ही आहे. पण या भरती प्रक्रियेत दोन मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत त्यामुळे जर तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल तर हे बदल जाणून घ्या आणि मगच फॉर्म भरा.

भारतीय सेना अग्निवीर अंतर्गत भरली जाणारी पदे (Indian Army) –

भारतीय सेना अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये अग्निवीर जनरल ड्युटी (GD), टेक्निकल, क्लार्क आणि स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेड्समन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल नर्सिंग केटरिंग, जेसीओ धार्मिक शिक्षक अशा विविध पदांसाठी जागा आहेत. याशिवाय हवालदार एज्युकेशन, हवालदार सर्वेयर आणि जेसीओ कॅटेगरीतील पदांसाठी देखील जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

अर्जाचा कालावधी –

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 12 मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल आहे. भारतीय सेना (Indian Army) या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. (Indian Army Agniveer Recruitment 2025)

महत्वाची माहिती –

अग्निवीर भरतीसाठी अर्ज शुल्क फक्त ₹२५० आहे. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. अन्य कोणतेही शुल्क लागू नाही. या भरतीसाठी लेखी परीक्षा जूनमध्ये होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच परीक्षेचे वेळापत्रक भारतीय सेनेच्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच अपलोड केले जाईल. उमेदवाराची जन्मतारीख 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008 या तारखे दरम्यान असावी. विविध पदांसाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

तसेच वाराणसी आर्मी भर्ती कार्यालयाचे संचालक यांनी सांगितले की, अर्ज करताना पालकांची नावे दहावीच्या प्रमाणपत्रावर आधारित भरावीत. अर्ज करताना मूळ डोमिसाईल प्रमाणपत्र वैध राहील. (Indian Army Agniveer Recruitment 2025)

हेल्पलाइन नंबर –

उमेदवारांना अर्ज भरताना कोणतीही अडचण आली तर ते भारतीय सेनेने दिलेल्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करू शकतात. हेल्पलाईन नंबर 7518900195 जारी केला आहे.

जाहीर केलेले दोन मोठे बदल –

दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. केलेल्या दोन महत्वपूर्ण बदलांची माहिती कर्नल शैलेश कुमार, वाराणसी आर्मी भर्ती कार्यालयाचे संचालक यांनी दिली.
1) यावेळी उमेदवारांना एका अर्जावर दोन पदांसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच, प्रत्येक उमेदवार एकाच अर्जावर दोन पदांसाठी अर्ज करू शकतो.

2) तसेच, यावेळी 1600 मीटर रेस श्रेणी चार प्रकारांमध्ये विभागली आहे. त्यानुसार, विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. अग्निवीर भरतीत, उमेदवारांना रेससाठी अतिरिक्त अर्ध्या मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. आता, सहा मिनिटे आणि पंधरा सेकंदात रेस पूर्ण करणे पात्र ठरेल. (Indian Army Agniveer Recruitment 2025)

हे पण वाचा – Cochin Shipyard Recruitment 2025: कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 70 रिक्त जागांची भरती; 10वी, 12वी च्या उमेदवारांना नोकरीची संधी