UPSC Exam Date 2024 : UPSC मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!! पहा परीक्षेची तारीख आणि वेळ

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC Exam Date 2024) मुख्य परीक्षा 2024 देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने IAS मुख्य परीक्षेसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेमध्ये परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा दि. 20, 21, 22, 28 आणि 29 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे.

परीक्षेची तारीख आणि वेळ
ज्या उमेदवारांनी प्राथमिक परीक्षेत यश मिळवले आहे आणि आता ते मुख्य परीक्षेला बसणार आहेत असे उमेदवार UPSC ची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन अधिसूचना डाउनलोड करून परीक्षांच्या तारखा पाहू शकतात. CSE मुख्य परीक्षा UPSC द्वारे दि. 20, 21, 22, 28 आणि 29 सप्टेंबर 2024 रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार असून पहिल्या शिफ्टची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत घेतली जाईल.

असं डाउनलोड करा वेळापत्रक (UPSC Exam Date 2024)
1. उमेदवारांनी विषय, तारीख आणि शिफ्टनुसार वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी प्रथम UPSC ची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यायची आहे.
2. वेबसाइटच्या होम पेजवर नवीन काय आहे, या विभागात परीक्षा वेळापत्रक नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2024 वर क्लिक करा. यानंतर PDF उघडेल.
3. आता तुम्ही समोर दिसणारे वेळापत्रक डाउनलोड करून प्रिंट काढून घेऊ शकता.

प्रवेशपत्रा संदर्भात महत्वाचे..
प्रवेशपत्रे फक्त अशाच उमेदवारांना दिली जातील जे पूर्व (UPSC Exam Date 2024) परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची प्रवेशपत्रे UPSC CSE मुख्य परीक्षा २०२४ परीक्षेच्या तारखेच्या काही दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com