करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (Big News) घेतलेल्या डीएड (D.El.Ed) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत मराठी व इंग्रजी माध्यमाचे तब्बल 30 टक्के शिक्षक नापास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचा डी.एड. चा निकाल 71.66 टक्के लागला आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली आहे.
राज्य परीक्षा परिषदेने जून 2024 मध्ये 6 जून ते 14 जून या कालावधीत परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना (Big News) निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवण्यासाठी 21 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
पास, नापास आकडेवारी अशी आहे (Big News)
डीएड द्वितीय वर्ष परीक्षेसाठी मराठी माध्यमाच्या 12 हजार 342 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 11 हजार 948 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले. प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 8 हजार 656 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 3 हजार 686 विद्यार्थी नापास झाले. मराठी माध्यमातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या (Big News) उत्तीर्णतेची टक्केवारी 70.13 टक्के आहे. इंग्रजी माध्यमातून 1 हजार 739 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 1 हजार 689 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 1 हजार 237 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेचा एकूण निकाल 71.13 टक्के एवढा लागला आहे.
डी. एड. द्वितीय वर्षाच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे –
1. माध्यम – मराठी, पास विद्यार्थी – 11948, नापास विद्यार्थी – 3686, टक्केवारी – 70.13%
2. माध्यम – उर्दू, पास विद्यार्थी – 2817, नापास विद्यार्थी – 648, टक्केवारी – 77.48%
3. माध्यम – हिंदी, पास विद्यार्थी – 301, नापास विद्यार्थी – 65, टक्केवारी – 78.96%
4. माध्यम – इंग्रजी, पास विद्यार्थी – 1689, नापास विद्यार्थी – 502, टक्केवारी – 71.13%
5. माध्यम – कन्नड, पास विद्यार्थी – 34, नापास विद्यार्थी – 03, टक्केवारी – 91.43%
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com