MPSC : MPSC सावध!! दिव्यांग उमेदवारांच्या कागदपत्रांची २९ जुलैला होणार पडताळणी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पूजा खेडकर प्रकरणानंतर खबरदारीचा (MPSC) उपाय म्हणून दिव्यांग प्रमाणपत्राच्या संदर्भात उमेदवाराच्या कागदपत्रांची काटेकोर तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) 20 मार्च 2024 रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची ततात्पुरती निवड यादी प्रसिध्द केली आहे. या यादीमधील काही उमेदवारांना त्यांच्या कागदपत्राच्या तपासणीसाठी दि. 29 जुलै रोजी उपस्थित राहण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

29 जुलैला होणार कागदपत्र पडताळणी (MPSC)
एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार संबंधित उमेदवारांनी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दिव्यांग प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी संबंधित अपिलीय प्राधिकरण यांच्याकडे उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी त्यांचे आवश्यक कागदपत्र बरोबर घेऊन येणे गरजेचे आहे. उमेदवारांनी दिलेल्या कालमर्यादेत दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवाराचे प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचे एमपीएससीकडून गृहीत धरले जाईल. तसेच त्याची उमेदवारी ही या प्रक्रियेतून रद्द करण्यात येईल; असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com