करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) नियोजित राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा येत्या दि. 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आयोगाने उमेदवारांचे हॉल तिकीट आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर mpsconline.gov.in उपलब्ध करून दिले आहे. यावरून मराठा समाजातील उमेदवारांना पूर्व परीक्षा होण्याच्या अगोदर EWS मधून SEBC विकल्प निवडण्याची संधी उपलब्ध करून द्यावी; अशी मागणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्या ‘X’ या सोशल मिडिया अकाऊंटद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 चे प्रवेश पत्र आयोगाकडून जारी करण्यात आले आहे. मराठा समाजातील EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना SEBC प्रवर्गात जाण्याची मुभा उपलब्ध करून देताना त्यामध्ये संदिग्धता होती. त्यामुळे फक्त 8 हजार विद्यार्थ्यांनी SEBC प्रवर्ग निवडला व अजूनही 50 हजार पेक्षा (MPSC) जास्त विद्यार्थी EWS प्रवर्गामध्ये आहेत. यासंदर्भात, आयोगाने शासनाकडून निर्देश मागविले होते. परंतु, अजूनही आयोगाला ते निर्देश प्राप्त झालेले नाहीत. ही बाब दुरुस्त केली नाही तर हजारो विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो. त्यामुळे यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने राज्य लोकसेवा आयोगाला तात्काळ निर्देश द्यावेत. विद्यार्थ्यांना SEBC सर्टिफिकेट काढण्याची वेळ उपलब्ध करून अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी द्यावी; अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com