करिअरनामा ऑनलाईन । यंदा NEET UG परीक्षा वादाच्या भोवऱ्यात (NEET UG 2024) सापडली आहे. या परीक्षेवरील वादाचे ढग दूर होत नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वर्षी NEET UG कटऑफ सर्वोच्च ठरला आहे. NEET UG पेपर लीक होण्याचा मुद्दा आधीच सुप्रीम कोर्टात होता, आता उमेदवार या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सोडले जाणार नाही; असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने NEET UG परीक्षेस 1000 हून अधिक उमेदवारांना पुन्हा बसण्याची परवानगी देण्याचा निर्णय दिला होता. पण आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटले (NEET UG 2024) आहे की जर NEET UG मध्ये 0.001% त्रुटी आढळली तर ती रद्द करून पुन्हा परीक्षा घेतली जाईल. यावर्षी NEET UG मध्ये 67 विद्यार्थ्यांना 720 गुण आणि ऑल एअर रँक 1 देण्यात आली आहे; हे खूपच आश्चर्यकारक आहे कारण असे आजपर्यंत कधीच घडले नव्हते. 2021 ते 2024 या वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना किती गुण आणि यावर कोणती रँक मिळाली ते जाणून घेवूया….
2021 आणि 2024 मधील NEET UG गुण आणि रँकमध्ये काय फरक आहे ते खालील तक्ता पाहिल्यानंतर लक्षात येईल
नीट मार्क्स | 2024 Rank | 2023 Rank | 2022 Rank | 2021 Rank |
720 | 1 | 1 | NA | 1 |
715 | 225 | 4 | 1 | 5 |
710 | 407 | 27 | 6 | 23 |
705 | 542 | 94 | 31 | 75 |
700 | 1770 | 294 | 49 | 130 |
650 | 21,724 | 6,803 | 4,246 | 3,921 |
600 | 80,468 | 28,619 | 20,577 | 18,695 |
NEET UG 2024 परीक्षा वादाच्या भोवऱ्यात का सापडली? (NEET UG 2024)
NEET UG परीक्षा 05 मे 2024 रोजी झाली. परीक्षा संपताच अनेक केंद्रांमधून NEET UG पेपर फुटल्याच्या बातम्या येऊ लागल्या. उमेदवारांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले होते. दरम्यान 14 जून ऐवजी NTA ने 4 जून 2024 रोजी NEET UG चा निकाल जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थी अधिकच अस्वस्थ झाले. त्यानंतर 67 विद्यार्थ्यांना पूर्ण गुण मिळाल्याचे समोर आले. हे घडणे जवळजवळ अशक्य होते. तेव्हापासून NEET UG परीक्षा वादात सापडली असून त्याची चौकशी सुरू आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com