CET Cell 2024 : CET 2024 परीक्षेच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर; इथे पहा निकाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell 2024) शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामाईक परीक्षांच्या निकालांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पीसीएम/पीसीबी, बीए/बीएस्सी बी.एड, बीएचएमसीटी, डीपीएन/एचपीएन, नर्सिंग, एलएलबी 5 वर्ष, बीसीए/बी.बी.ए/बी.बी.सी.ए/बीएम.एस./बी.बी.एम सीईटी 2024 परीक्षांच्या संभाव्य निकालाच्या तारखा सीईटी सेलकडून (CET Cell) त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्या आहेत.

या तारखेला जाहीर होणार निकाल (CET Cell 2024)
एमएचटी सीईटी पीसीएम/पीसीबी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल दि. 10 जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे. तर बीएचएमसीटी दि. 11 जून, बीए/बीएस्सी बी.एड सीईटी दि. 12 जून, डीपीएन/एचपीएन दि. 12 जून, एमएचएमसीटी सीईटी दि. 13 जून, नर्सिंग दि. 16 जून, एलएलबी 5 वर्ष सीईटी दि. 16 जून आणि बीसीए/बी.बी.ए/बी.बी.सी.ए/बीएम.एस./बी.बी.एम सीईटी दि. 17 जून 2024 रोजी प्रवेश अभ्यासक्रम परीक्षांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.

इथे पहा निकाल –
वरील सर्व परीक्षांचे निकाल सीईटी सेलची (CET Cell 2024) अधिकृत वेबसाईट https://www.mahacet.org वर प्रसिद्ध करण्यात येईल; असे CET Cell कडून सुचना पत्रात नमुद करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com